शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

परत येतोय स्क्रब टायफस : नागपुरात तीन रुग्णांची नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:48 IST

गेल्या वर्षी ‘स्क्रब टायफस’च्या आजाराने २९ रुग्णांचे बळी घेतले होते, तर १५५ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी पावसाला सुरुवात होत नाही तोच तीन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागानुसार, रुग्णामध्ये मानेवाडा भागातील एक युवक, नवी इतवारी भागातील एक मुलगी व काचीपुरा परिसरातील चारवर्षीय मुलाचा समावेश आहे.

ठळक मुद्देगेल्यावर्षी २९ रुग्णांचा घेतला होता बळी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षी ‘स्क्रब टायफस’च्या आजाराने २९ रुग्णांचे बळी घेतले होते, तर १५५ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी पावसाला सुरुवात होत नाही तोच तीन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागानुसार, रुग्णामध्ये मानेवाडा भागातील एक युवक, नवी इतवारी भागातील एक मुलगी व काचीपुरा परिसरातील चारवर्षीय मुलाचा समावेश आहे.‘ट्रॉम्बिक्युलीड माईट्स’चे लारव्हे; ज्याला ‘चिगर माईट्स’ म्हणतात त्याच्यातील ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने स्क्रब टायफसचा धोका होतो. स्क्रब टायफसवर उपचार न घेतल्यास साधारण २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. योग्य उपचार मिळाले नाही तर ५० टक्के रुग्णांचा मृत्यूही होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नागपुरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. एकट्या नागपुरात १५५ रुग्णांची नोंद झाली होती, तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या आजाराचे मूळ शोधून काढण्यासाठी नागपुरात दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राची (एनआयसीडी) चमू आली होती. त्यांच्या मदतीला पुण्याच्या सहसंचालक आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातील कीटकशास्त्रज्ञ चमू होती. शिवाय, रुग्ण आढळून येणाऱ्या भागातील उंदीर पकडण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले होते. पकडलेल्या उंदरांच्या अंगावरील ‘चिगर माईट्स’ काढून अभ्यासही केला होता. परंतु पावसाळा संपताच या आजाराचे रुग्ण कमी झाल्याने नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढताच पुन्हा रुग्ण आढळून आले आहेत. हिवताप व हत्तीरोग विभागाच्या जयश्री थोटे यांनी गुरुवारी स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्क्रब टायफसचे तीन रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. या रुग्णाच्या रक्ताचे नमुने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’कडे (एनआयव्ही) पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.या भागातील आहेत रुग्णस्क्रब टायफसचे आढळून आलेला रुग्णामध्ये एक युवक रुग्ण मानेवाडा भागातील, नवी इतवारी भागातील एक मुलगी तर चार वर्षीय मुलगा हा काचीपुरा परिसरातील आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय