शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेय समूहाकडून गंडविलेल्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:41 IST

वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया मैत्रेय समूहाच्या फसवणुकीचा बोभाटा झाल्यानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी गुरुवारी मैत्रेयच्या कार्यालयासमोर चांगलाच गोंधळ घातला.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांचा गोंधळ : वर्षा सतपाळकर, साथीदारांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया मैत्रेय समूहाच्या फसवणुकीचा बोभाटा झाल्यानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी गुरुवारी मैत्रेयच्या कार्यालयासमोर चांगलाच गोंधळ घातला. अनेक गुंतवणूकदारांनी आक्रोश व्यक्त करीत आपली रक्कम कशी परत मिळेल, असा पोलिसांना सवाल केला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दिवसभर या कार्यालयाचा ताबा घेत कागदपत्रांची तपासणी केली.मुंबईच्या वसईतील रहिवासी असलेल्या वर्षा सतपाळकर ही या समूहाची प्रमुख असून तिचा पती मधुसूदन सतपाळकरने १९८८ मध्ये या कंपनीची निर्मिती केली होती. मधुसूदनच्या मृत्यूनंतर या कंपनीची सर्वेसर्वा झालेल्या वर्षाने लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे, नितीन चौधरी, जनार्दन अरविंद परुळेकर आणि विजय मिस्त्री आदी साथीदारांच्या मदतीने राज्यातील अनेक मोठ्या शहरात मैत्रेयच्या शाखा उघडून गुंतवणूकदरांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले. २०१० मध्येच नागपुरात मैत्रेयच्या गोरखधंद्याला सुरुवात झाली होती. येथील पंचशील चौकात प्रारंभी मैत्रेयचे कार्यालय उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार गळाला लागल्यानंतर मुंजे चौकात फॉर्च्युन मॉलमध्ये कंपनीचे कार्यालय थाटण्यात आले. एक हजाराहून अधिक एजंट नागपूर-विदर्भातील गुंतवणूकदारांना विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या जाळळ्यात ओढत होते.त्यांना वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष देत आपली रक्कम जमा करायला लावत होते. जमा ठेव योजना, स्वर्णसिद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास विशिष्ट अवधीत रक्कम दुप्पट देण्याची हमी दिली जात होती. मैत्रेयच्या या विविध योजनांचे सदस्य झालेल्या गुंतवणूकदारांना धनादेश आणि वचनपत्र दिले जात होते. यासोबतच निर्धारित कालावधीत पैसे, सोन्याची नाणी आणि भूखंड देण्याची हमी दिली जात होती. तीन वर्षांत हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाºया या कंपनीचे २०१३ मध्ये हळूहळू बिंग फुटायला सुरयवात झाली. कारण कंपनीने गुंतवणूक करणाºयांना त्यांची रक्कम देणे बंद केले. त्यामुळे नागपूरसह राज्यातील इतर शहरातही मैत्रेयच्या शाखात संशयकल्लोळ निर्माण झाला होता. दरम्यान,नाशिक येथे गुंतवणूदारांच्या तक्रारीनंतर वर्षा सतपाळकर आणि जनार्दन अरविंद परुळेकर याला अटक झाल्यानंतर नागपुरातही गुंतवणूकदारांनी धंतोली पोलिसात तक्रार नोंदविली.पोलिसांनी थंडपणा दाखवल्यानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. प्रदीर्घ तपासानंतर बुधवारी गुन्हा दाखल केला. त्यात वर्षासह लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे, नितीन चौधरी, जनार्दन अरविंद परुळेकर आणि विजय मिस्त्री यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे गुरुवारी वृत्तपत्रातून प्रकाशित होताच संतप्त गुंतवणूकदारांनी आज सकाळपासूनच मैत्रयच्या कार्यालयात धाव घेतली. तेथे पोलीस बंदोबस्त बघून संतप्त गुंतवणूकदारांनी आपला रोष व्यक्त करणे सुरू केले.काहींनी तोडफोड केली. तर, काहींनी वर्षा व तिच्या साथीदारांच्या नावांनी शिव्या शाप देत आक्रोश चालवला. पोलिसांनी त्यांची कशीबशी समजूत घालून त्यांना दूर ठेवले.पूर्ण चौकशीनंतर कार्यालयाला सीलदुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळपासूनच मैत्रेयच्या कार्यालयात धडक देऊन कागदपत्रे, लॉकर, कपाटांची तपासणी केली. सर्वच बनवाबनवी असल्यामुळे काय जप्त करावे आणि काय नको असा प्रश्न पोलिसांसमोर पडला आहे. या प्रकरणात तूर्त चौकशी सुरू असल्यामुळे सध्या काही सांगता येणार नसल्याचे पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे) श्वेता खेडकर यांनी लोकमतला सांगितले. वर्षा आणि तिच्या साथीदारांचा शोध सुरू तूर्त कार्यालयाला सील केले नसले तरी या कार्यालयावर पोलिसांची २४ तास नजर राहणार असल्याचेही खेडकर म्हणाल्या. संपूर्ण चौकशीनंतरच कार्यालयाला सील लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.