शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अर्थसंकल्पाला २५ टक्के कात्री : रस्त्यांच्या कामांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 21:17 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सन २०१९-२० या वर्षाच्या अर्थसंकल्पाला २५ टक्के कपात लावली आहे. यामुळे शहरातील सिमेंट काँक्रीट रोड, डांबरी रस्ते, केळीबाग व भंडारा रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट, बुधवार बाजारातील प्रस्तावित व्यापारी संकुल अशा प्रमुख कामांना फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देडांबरी व सिमेंट रस्ते,ऑरेंज सिटी स्ट्रीट, केळीबाग रोड, व्यापारी संकुलांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सन २०१९-२० या वर्षाच्या अर्थसंकल्पाला २५ टक्के कपात लावली आहे. ३१९७.६० कोटींच्या अर्थसंकल्पाला ८०० कोटींचा कट लागणार आहे. यामुळे शहरातील सिमेंट काँक्रीट रोड, डांबरी रस्ते, केळीबाग व भंडारा रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट, बुधवार बाजारातील प्रस्तावित व्यापारी संकुल अशा प्रमुख कामांना फटका बसण्याची शक्यता आहे.वित्त वर्षात महापालिकेच्या तिजोरीत ३१ मार्च २०२० पर्यंत जमा होणारा महसूल विचारात घेता २३९७.६० कोटींचा निधी तिजोरीत येण्याचा अंदाज आहे. याचा विचार करता आयुक्तांनी अर्थसंकल्पातील तरतुदीच्या ७५ टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना दिले आहेत. याातून आवश्यक खर्च, दिव्यांगांच्या योजना व दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या निधीला वगळण्यात आले आहे.अर्थसंकल्पात डांबरीकरण व काँक्रिटीकरण यासाठी १०४.०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील ७६ कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळेल. सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतूद आहे. यातील ७५ कोटीपर्यंत खर्चाला मंजुरी मिळेल. ११० कोटी खर्चाच्या केळीबाग व भंडारा रोडच्या कामात महापालिकेला वाटा उचलावयाचा आहे. यालाही कात्रीचा फटका बसणार आहे. बाजार विकासासाठी २५ कोटी तर नगरभवन येथील बांधकामासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या विकास कामाच्या खर्चात ८.५ कोटींची कात्री लगणार आहे.ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पासाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या खर्चाला १५ कोटींची कात्री लागेल. विद्युत विभागासाठी १६५ कोटींची तरतूद आहे. या खर्चालाही कात्री लागण्याची शक्यता आहे. तसेच शासनाकडुन अनुदान मिळालेल्या काही प्रकल्पाला महापालिकेला आपला वाटा उचलावयाचा आहे. अशा खर्चावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.प्रगतीवरील कामांवर परिणामअन्य विभागाला आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रात तरतुदीच्या ७५ टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी आयुक्तांनी पत्र जारी केलेल्या पत्रात अर्थसंकल्पातील तरतुदीत २५ टक्के कपात करण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना दिले. .त्यामुळे ज्या शिर्षकातील ७५ टक्के रक्कम खर्च झाली आहे त्यात पुढे खर्च करता येणार नाही. यामुळे प्रगतीवर असलेल्या विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प