शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:37 IST

सरकार व शिक्षण विभागाचा निषेध : ८६ कोटी रुपये थकीतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील शाळांचे सरकारवर ८५ कोटी १४ लाख ७ हजार रुपये थकीत आहे. आरटीईचा परतावा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याने, विना अनुदानित शाळांची अवस्था डबघाईस येत आहे. थकीत अनुदानासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ...

सरकार व शिक्षण विभागाचा निषेध : ८६ कोटी रुपये थकीतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील शाळांचे सरकारवर ८५ कोटी १४ लाख ७ हजार रुपये थकीत आहे. आरटीईचा परतावा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याने, विना अनुदानित शाळांची अवस्था डबघाईस येत आहे. थकीत अनुदानासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास ७०० शाळांनी काळा दिवस साजरा करून, शासन व शिक्षण विभागाचा निषेध केला.आरटीईअंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. त्या मोबदल्यात शासन शाळांना परतावा देते. परंतु २०१२ पासून २०१७ पर्यंत शासनाने आरटीईचा परतावा नियमित दिला नाही. गेल्या तीन वर्षांपासून आरटीईचा एकही रुपया शाळांना मिळाला नाही. यासंदर्भात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल स्टडीज असोसिएशनच्या (मेस्टा) वतीने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेण्यात येत नसल्याने, मेस्टाने १२ आॅक्टोबर हा दिवस शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांनी गुरुवारी शाळांमध्ये काळ्या फिती बांधून विद्यार्थ्यांना शिकविले. काही शाळांमध्ये काळे ध्वज शाळेच्या गेटवर लावण्यात आले होते. या आंदोलनातून शाळांनी शासन व शिक्षण विभागाचा मूक निषेध नोंदविला. आरटीईचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत असतानाही, आरटीईचे प्रवेश नाकारल्यावर शिक्षण विभागाचे अधिकारी कारवाईची भाषा बोलतात. सरकारचे मंत्री, सचिव आमच्या मागण्या कानावरही घेत नाही. शासनाकडून एक रुपयांचे अनुदान नाही. अशा परिस्थितीत शाळा चालविणार कशा? काळा दिवस पाळूनही आमच्या मागण्या शासन गंभीरतेने घेत नसेल, तर येणाºया हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चे काढण्यात येतील. हे आंदोलन भविष्यात उग्ररूप धारण क रेल, असा इशारा संघटनेचे सचिव कपिल उमाळे, कोषाध्यक्ष नरेश भोयर यांनी दिला.