राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना, महापालिका, स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचारविनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिल्लीत कोरोनाची लाट पुन्हा आली आहे. नागपुरातही दिवाळीनंतर कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक पालकांचाही मुलांना कोरोना काळात शाळेत पाठवण्यास विरोध आहे. याचा विचार करता महापालिका आयुक्तांनी शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
१३ डिसेंबरपर्यंत शाळांना लॉकच....जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST