शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीची सोशल मीडियावर बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 10:04 IST

एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने शाळकरी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केले. त्यावर लज्जास्पद मेसेज आणि फोटो अपलोड करून ते व्हायरल केल्याची घटना उजेडात आली आहे.

ठळक मुद्देफेक इन्स्टाग्राम आयडी लज्जास्पद मेसेज व फोटो व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने शाळकरी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केले. त्यावर लज्जास्पद मेसेज आणि फोटो अपलोड करून ते व्हायरल केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी कासिफ खान (वय १८, रा. अवस्थीनगर) तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.आरोपी कासिफ आणि पीडित मुलगी (वय १५) एकाच वस्तीत राहतात. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. आरोपीच्या प्रेमाला तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून कासिफने तिच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यावर तिचा कटपेस्ट केलेला डीपी ठेवला अन् त्या माध्यमातून अश्लील मेसेज तसेच फोटो व्हायरल केले. १८ आॅक्टोबर २०१८ पासून आरोपीने सुरू केलेला हा उपद्रव १० मे २०१९ ला लक्षात आला. त्यामुळे मुलीच्या पालकांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीने तपास केला असता आरोपी कासिफ आणि त्याच्या साथीदारांनी हे कुकृत्य केल्याचे उघड झाले. त्यावरून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचे कलम ३५४ तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया