शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

शाळकरी मुलीवर अत्याचार

By admin | Updated: July 26, 2016 02:19 IST

ओळखीच्या तरुणाने शाळकरी मुलीला मैत्रिणीमार्फत नातेवाईकाच्या घरात बोलवून पाशवी बलात्कार केला.

आरोपीला अटक : नंदनवनमधील घटनानागपूर : ओळखीच्या तरुणाने शाळकरी मुलीला मैत्रिणीमार्फत नातेवाईकाच्या घरात बोलवून पाशवी बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. मुलीला असह्य वेदना झाल्याने उशिरा रात्री ही संतापजनक घटना उघडकीस आली. मुलीच्या आईने मध्यरात्री तक्रार नोंदविताच पोलिसांनी आरोपी राहुल बबनराव भिवगडे (वय २२, रा. पारडी) याला अटक केली. आरोपीची मुलीला धमकी शाळकरी मुलीवर अत्याचारनागपूर : इमामवाड्यातील शाळकरी मुलीच्या बलात्काराची घटना ताजीच असताना पुन्हा शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी १६ वर्षांची असून, १० वीत शिकते. तिला वडील नाहीत. दोन मोठ्या बहिणी आणि आईसह ती भाड्याच्या घरात राहते. आई धुणीभांडी करून उदरनिर्वाह करते. पीडित मुलीच्या घरमालकासोबत आरोपी राहुल भिवगडेचे नातेसंबंध आहेत. त्यामुळे तो नेहमीच तेथे येतो. त्यामुळे आरोपीची पीडित मुलीसोबत ओळख आहे. कधी कधी तो पीडित मुलीच्या घरीही येत होता. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास तो नेहमीप्रमाणे नातेवाईकाच्या घरी आला. तेरवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरमालक आणि त्याचा परिवार बाहेर गेले होते. त्याने एका मैत्रिणीमार्फत निरोप देत पीडित मुलीला नातेवाईकांच्या घरी बोलवले. ती घरात आल्यानंतर दार बंद करून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास असह्य वेदना होत असल्यामुळे पीडित मुलगी रडू लागली. आईने विचारणा केली असता तिने पोटात दुखत असल्याचे खोटेच सांगितले. आईने तिला डॉक्टरकडे नेले. पोटदुखीचे औषध घेऊन ती परत आली. मात्र, तिला वेदना होत असल्याने औषधाचा फायदा झाला नाही. रात्री ११.१५ ला ती असह्य वेदनांनी रडू लागल्यानंतर आईने तिला बघितले. त्यानंतर हा गंभीर प्रकार आईच्या लक्षात आला. पीडित मुलीला घेऊन आई लगेच नंदनवन पोलीस ठाण्यात पोहचली. रात्री ११.३० ला पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)अटक आणि पोलीस कोठडीशाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नंदनवन ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सुनील महाडिक, महिला उपनिरीक्षक बावनकर यांनी आरोपीच्या घराचा पत्ता मिळवला. त्यानंतर रात्री १२.३० च्या सुमारास त्याला त्याच्या घरी झोपेतच जेरबंद करण्यात आले. त्याला सोमवारी कोर्टात हजर करून त्याचा २७ जुलैपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला. आरोपी राहुल सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानात नोकर असून, त्याच्यावर यापूर्वी कुठे काही गुन्हे दाखल आहेत काय, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.