शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसाठी शाळाच आली त्यांच्या दारी; शाळाबाह्य मुलांसाठी बसमध्येच शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 06:46 IST

या बसमध्ये मुलांना  बसण्यासाठी डेक्सबेंच, शिकवायला फळा आहे. 

मंगेश व्यवहारे 

नागपूर : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाचे चार ते पाच सर्वेक्षण झाले. सापडलेल्या मुलांना शाळेतही घातले गेले. पण मुले शाळेत टिकली नाहीत. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम महिला व बालविकास विभागाने नागपुरात यशस्वी केले. या मुलांसाठी बसमध्येच शाळा तयार केली आणि ती वस्त्यांमध्ये फिरविली. गेल्या ४ महिन्यात २५५ मुले या फिरत्या शाळेत येत असून, प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहेत. 

सुरुवातीला मुलांना बसमध्ये बसविताच पालकांकडून विरोध झाला. आम्ही मुलांना बसमध्ये पकडून नेणार अशी त्यांची भावना होती. त्यामुळे पालक बसभोवती गराडा घालायचे. आम्ही त्यांना शाळेची गोडी लावली. आज शाळा असेल त्या दिवशी मुले नियमित येतात.-दिव्या ठाकरे, शिक्षिका

फिरते पथक हा प्रकल्प रस्त्यावर भटकणाऱ्या, झोपडपट्टी भागातील शिक्षणापासून वंचित मुलांसाठी आहे. शिक्षणाची गोडी निर्माण  करून त्यांना जवळच्या शाळेमध्ये समाविष्ट करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे -भारती मानकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

वाड्या-वस्त्यांवर फिरते बसवाठोडा येथील तुलसीनगर झोपडपट्टी, शीतला माता झोपडपट्टी, संत्रा मार्केट रेल्वेस्थानक, राजनगर झोपडपट्टी, भांडेवाडी, ताजबाग, यशोधरानगर, कळमना, हिंगणा, यशवंत स्टेडियमच्या भागात एक पिवळ्या रंगाची बस उभी असते. या बसमध्ये मुलांना  बसण्यासाठी डेक्सबेंच, शिकवायला फळा आहे. बसमध्ये सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग सिस्टीम आहे. बालस्नेही वातावरण राहील याची काळजी घेण्यात आली आहे. दररोज दोन वस्त्यांमध्ये ही बस फिरते.