शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबस उलटली; १५ विद्यार्थिनी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 22:57 IST

चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली स्कूलबस रोडच्या खाली उतरली. रोडलगत खोलगट भाग असल्याने ती उलटली. त्यात बसमधील १५ विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील वाकेश्वर शिवारातील घटना : रोडच्या कडेला खोलगट भाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (बुटीबोरी) : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली स्कूलबस रोडच्या खाली उतरली. रोडलगत खोलगट भाग असल्याने ती उलटली. त्यात बसमधील १५ विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. ही घटना कुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकेश्वर शिवारात सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.जखमींमध्ये जान्हवी उईके, गौरी धुर्वे, अनन्या सरोज, श्रेया वरकडे, शिवानी नामूर्ते, खुशी परिहार, कशीश पटेल, नीतू अंबाडरे, गायत्री गायकवाड, अंजली वरठी, नंदिनी भोजने, अनुष्का वांदिले व कशीश भिमटे यांच्यासह अन्य दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. या सर्व नागपूर येथील लक्ष्मीदेवी धीरन कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. बुटीबोरी परिसरातील जंगेश्वर, बोरखेडी (फाटक), बोरखेडी (रेल्वे), बुटीबोरी, सातगाव, मोहगाव, वाकेश्वर व वारंगा येथील एकूण ४० विद्यार्थिनी नागपूर येथील लक्ष्मीदेवी धीरन कन्या विद्यालयात शिकतात. त्या रोज शाळेने नेमून दिलेल्या एमएच-४०/बीजी-७२३४ क्रमांकाच्या स्कूलबसने ये-जा करतात.सोमवारी सकाळी ही बस विद्यार्थिनींना घेऊन वारंगा येथून बुटीबोरीच्या दिशेने निघाली. बुटीबोरी वारंगा हा मार्ग अरुंद आहे. वाकेश्वर शिवारात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती बस रोडखाली उतरली. रोडलगत खोलगट भाग असल्याने ती लगेच उलटली. त्यात बसमधील १५ विद्यार्थिनी जखमी झाल्या. बस उलटताच बसचालक श्रीराम शिरोडे, रा. ब्राह्मणी याने बस सोडून पळ काढला.माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून सर्व विद्यार्थिनींना बसमधून बाहेर काढले आणि बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे उपचार केल्यानंतर सर्व विद्यार्थिनींना सुटी देण्यात आली. शिवाय, पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व बस ताब्यात घेत सरळ करून पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केली. वृत्त लिहिस्तो बसचालक श्रीराम शिरोडे यास अटक करण्यात किंवा ताब्यात घेण्यात आले नव्हते.वर्षभरातील दुसरी घटनावर्षभरापूर्वी अर्थात १० डिसेंबर २०१८ रोजी याच शाळेच्या स्कूलबसचा बुटीबोरी परिसरातील सालईदाभा शिवारात अपघात झाला होता. त्यात संस्कृती लोकेश वर्मा (१५, रा. सातगाव) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, बसचालक श्रीराम शिरोडे याला दारूचे व्यसन असल्याची माहिती काही पालकांनी दिली असून, त्याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. याबाबत पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रारही केली होती, असेही काहींनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी