शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अ‍ॅन्टीरेबीज लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:07 IST

श्वान चावल्यानंतर रेबीजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अ‍ॅन्टीरेबीज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्येही ही लस केवळ दारिद्र्य रेषेखालील रुग्णाला तेही त्याने सोबत शिधापत्रिका आणली असेल तरच दिली जाते.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमधील रुग्ण अडचणीत : मनपाकडूनही रुग्णांची बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वान चावल्यानंतर रेबीजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अ‍ॅन्टीरेबीज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्येही ही लस केवळ दारिद्र्य रेषेखालील रुग्णाला तेही त्याने सोबत शिधापत्रिका आणली असेल तरच दिली जाते.श्वानदंशामुळे दरवर्षी साधारण २० हजार लोकांचा ‘रेबीज’मुळे मृत्यू होतो. यात १५ वर्षे वयोगटाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. लस न टोचलेली कुत्री मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो. विशेष म्हणजे, श्वान चावल्यानंतर देण्यात येणारी लसीची किंमत गरिबांना परवडणारी नाही. यातही केवळ ‘बीपीएल’च्या रुग्णांनाच ही लस उपलब्ध करून देण्याचे मेयो, मेडिकलचे धोरण आहे. सध्या तरी या दोन्ही रुग्णालयात अ‍ॅन्टीरेबीज लस नसल्याचे सांगण्यात येते. मेयो व मेडिकलमध्ये आठवडाभरात सुमारे ७० ते ८० वर अ‍ॅन्टीरेबीज लसीची गरज भासते. महिन्याची सरासरी काढली तर मेडिकलला दरमहा ५०० अ‍ॅन्टीरेबीज लसी लागतात. ही लस ‘इंडियन इम्युनॉलॉजिकल’कडूनच मिळते. मात्र मागणीच्या तुलनेत फार कमी साठा पुरवठादाराकडून मिळतो. परिणामी, तुटवडा निर्माण होतो.‘हाफकीन’कडून लसीची प्रतीक्षावैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मेडिकलला औषध पुरवठा करण्याची जबाबदारी ‘हाफकीन कॉर्पाेरेशन’कडे देण्यात आली आहे. परंतु या हाफकीनकडून अद्यापही अ‍ॅन्टीरेबीज लसीसह इतरही आवश्यक औषधे उपलब्ध न झाल्याने दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.सुटीच्या दिवशी मिळत नाही लसमेयो, मेडिकलमध्ये या लसीचा तुटवडा पडल्याने कुत्रा चावलेल्यांना महापालिकेच्या इस्पितळांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. मनपाच्या सदर आणि महाल येथील इस्पितळांमध्ये अ‍ॅन्टीरेबीजची लस उपलब्ध आहे. परंतु रविवार व इतर सुटींच्या दिवशी ही दोन्ही इस्पितळे बंद राहत असल्याने रुग्णांची बोळवण होत आहे. इतर दिवशीही ठराविक वेळेतच ही लस मिळते. यामुळे गरिबांनी करावे काय, हा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :dogकुत्राmedicineऔषधं