शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'मैंने ब्रेकअप कर लिया'.. म्हणत टॅटू मिटवण्यासाठी तरुणाईची मेडिकलमध्ये संख्या वाढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 07:00 IST

Nagpur News हौसेने तिचे किंवा त्याचे नाव गोंदवून घेतले असले तरी संबंध तुटताच ते काढून टाकण्यासाठी जीवाची आटापिटा करताना दिसून येत आहे. टॅटू मिटविण्यासाठी मेडिकलच्या स्किन विभागात रोज तीन ते चार तरुण-तरुणी येत आहेत.

ठळक मुद्देमेडिकलच्या स्किन विभागात रोज येत आहेत तीन ते चार तरुण-तरुणी

सुमेध वाघमारेनागपूर : दिवसागणिक प्रेमाची परिभाषा बदलत आहे, तसे प्रियकर, प्रेयसीमध्येही बदल जाणवत आहेत. आज सोबत असलेली ती किंवा तो उद्या असेलच असे नाही. यामुळे हौसेने तिचे किंवा त्याचे नाव गोंदवून घेतले असले तरी संबंध तुटताच ते काढून टाकण्यासाठी जीवाची आटापिटा करताना दिसून येत आहे. टॅटूने वैतागल्यांसाठी मेडिकलच्या स्किन विभागाची मदत मिळत आहे. टॅटू मिटविण्यासाठी रोज तीन ते चार तरुण-तरुणी येत आहेत.दिवसेंदिवस टॅटूची क्रेझ वाढत आहे. याला सर्वांत उचलून धरले ते प्रेमवीरांनी. भावनेच्या भरात बोटावर, मनगटावर, दंडावर, छातीवर, मानेवर तिच्या किंवा त्याच्या नावाचा परमनन्ट टॅटू काढला जात आहे. धरमपेठ येथील टॅटू आर्टिस्ट यांनी सांगितले, दिवसभरात पूर्वी चार ते पाच जण टॅटू काढण्यासाठी यायचे; परंतु आता गर्दी वाढल्याने अपॉइंटमेंट घेऊन त्यांना बोलवावे लागत आहे. आम्ही टॅटू काढताना यातील धोके सांगतो; परंतु अनेक जण ऐकण्यापलीकडे असतात. जेव्हा प्रेमभंग होऊन टॅटूने वैतागतात, तेव्हा ते मिटविण्यासाठीही येतात. अलीकडे यांचीही संख्या वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले. मेडिकलमध्ये टॅटू मिटविण्यासाठी ह्यक्यू स्विच्ड लेजर ट्रीटमेंटह्ण नावाचे यंत्र आहे. सध्या याचा वापर वाढल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.-दर तीनपैकी एक जण कंटाळलेलाप्रेयसी किंवा प्रियकराच्या नावाच्या टॅटूला कंटाळलेल्यांची संख्या वाढत असताना आता जुन्या झालेल्या टॅटूचाही वैताग आल्याची संख्या वाढत आहे. पाश्चात्त्य देशामध्ये नुकत्याच झालेल्या त्वचारोगतज्ज्ञांच्या परिषदेत ह्यटॅटूह्णकरांचा वैताग उघडकीस आला. ह्यटॅटूह्ण काढून घेतलेल्या दर तीनपैकी एक जण त्याला कंटाळला असल्याचे या परिषदेत उघड झाले. एका खासगी रुग्णालयातील त्वचातज्ज्ञांनी केलेल्या सहाशे लोकांच्या पाहणीत पुरुषांपेक्षा महिला ह्यटॅटूह्णला जास्त वैतागल्याचे आढळून आले. यात ब्रेकअप झालेल्या तिच्या किंवा त्याच्या नावाचा टॅटू मिटवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती.-टॅटू मिटविण्यासाठी चार ते पाच वेळा घ्यावे लागतात उपचारमेडिकलच्या त्वचारोग विभागाचे डॉ. जयेश मुखी म्हणाले, कायमस्वरूपी टॅटू मिटविण्यासाठी अलीकडे तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे. टॅटू मिटविण्यासाठी चार ते पाच वेळा उपचार घ्यावे लागतात. विशेष म्हणजे, लाल रंगाचे टॅटू मिटविणे कठीण जाते. यात जास्त वेळ जातो. टॅटू मिटविल्यावर पडलेला डाग मिटविण्यासाठी वेगळा उपचार घ्यावा लागतो.-स्कीन स्टोनची मदतटॅटू आर्टिस्ट यांनी सांगितले, स्कीन स्टोनच्या मदतीने छोट्या आकाराचा टॅटू लपवता येतो. या प्रक्रियेत कायमस्वरूपी काढलेल्या टॅटूवर त्याचा त्वचेसारखा रंग तयार केला जातो. नीडल मशीनने हा रंग त्वचेच्या तिसऱ्या स्तरापर्यंत अंदाजे २ मिलिमीटर पेनीट्रेट केले जाते; परंतु याचा फायदा ८० टक्केच होतो.

टॅग्स :Healthआरोग्य