शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Savner Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला तोडण्यात भाजपला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 02:02 IST

Saoner Election Results 2019 : Sunil Kedar Vs Rajiv Potdar,Maharashtra Assembly Election 2019

ठळक मुद्देपहिल्या फेरीपासून काँग्रेसची आघाडी : पोतदार यांचा पराभव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (सावनेर) : सावनेर विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येथील मतदारांनी काँग्रेसचे सुनील केदार यांना २६ हजार २९१ मतांची आघाडी घेत पाचव्यांदा विधानसभेत पाठविण्याचा विक्रमही केला. केदार यांची या मतदारसंघावर चांगली पकड असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले. यावेळी भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरविले होते. त्यांच्या प्रचारार्थ या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भरगच्च प्रचारसभाही झाल्या. त्यामुळे वातावरणनिर्मितीही बऱ्यापैकी झाली शिवाय, शिवसेनाही दिमतीला होती. मात्र, मतदारांनी कौल दिला तो सुनील केदार यांना. केदार यांना १,१३,१८४ तर पोतदार यांना ८६,८९३ मते मिळाली. वास्तवात या मतदारसंघातील कळमेश्वर, सावनेर व खापा या तिन्ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी शहरांसोबतच ग्रामीण भागात भाजपचे संघटन पाहिजे तसे मजबूत नाही. याचाही फटका डॉ. पोतदार यांना बसला.सुनील केदार यांनी त्यांच्या मतांची आघाडी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत डॉ. पोतदार यांचा २६,२९१ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात बसपाच्या संचयता पाटील यांनी भाग्य आजमावले. त्यांना २.०७ टक्के अर्थात ४,३८१ मते तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद बागडे यांना १.६७ टक्के म्हणजे ३,५३९ मते मिळाली. या मतदारसंघात एकूण आठ उमेदवार उभे असले तरी, या दोन्ही नेत्यांऐवजी तिसरा प्रभावी नेता रिंगणात नसल्याने काँग्रेसच्या परंपरागत मतांची फारशी विभागणी झाली नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019savner-acसावनेरSunil Kedarसुनील केदार