शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सावनेरात ‘चक्का जाम’

By admin | Updated: February 13, 2017 02:41 IST

मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकास क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली.

बसचालकास मारहाण : कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बसस्थानकात तणाव सावनेर : मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकास क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या घटनेचे लगेच पडसाद उमटले आणि एसटी कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ ‘चक्का जाम’ आंदोलनाला सुरुवात केली. ही घटना सावनेर बसस्थानकात रविवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. या आंदोलनामुळे बहुतांश बसेस आगारात अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. भिवंडी येथे एसटी बसचालकास काही रिक्षेवाल्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्या बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच सावनेर आगारात बसचालकास मारहाण केल्याची घटना घडल्याने एसटीचे कर्मचारी आक्रमक झाले होते. मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने एमपी-२८/पी-१०६२ क्रमांकाची बस सावनेर बसस्थनकानाच्या आवारातील सुलभ शौचालयाच्या समोर उभी केली होती. वास्तवात, मध्य प्रदेश परिवहनच्या बसेस या बसस्थानकाच्या आवारातच दुसरीकडे उभ्या केल्या जातात. दरम्यान, एमएच-४०/एन-९५४१ क्रमांकाची एसटी महामंडळाची बस बसस्थानकाच्या आवारात आल्यानंतर बसचालकाने ही बस मध्य प्रदेश परिवहनच्या बसच्या मागे उभी केली. त्यातच एसटी बसचालक जी. आर. पठाने यांनी मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकास येथे त्याने बस का उभी केली, अशी सहज विचारणा केली. त्यावर चिडलेल्या मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने पठाने यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात पठाने जखमी झाले. त्यानंतर मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने बसस्थानकातून बस सोडून पळ काढला. हा प्रकार एसटीच्या इतर कर्मचाऱ्यांना कळताच ते आक्रमक झाले. एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ रोष व्यक्त करीत ‘चक्का जाम’ आंदोलनाला सुरुवात केली. कारण, यापूर्वीही बसचालक व वाहकास मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना तत्काळ आळा घालावा, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. या संदर्भात कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एसटी प्रशासनाकडे लेखी आश्वासनाची मागणी केल्याने पेच निर्माण झाला होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत यावर कोणताही तोडगा न निघाल्याने सावनेर आगाराची एकही बस धावली नाही. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. (तालुका प्रतिनिधी) पोलिसांचा हस्तक्षेप कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे सावनेर आगाराचे दिवसभरात चार लाख रुपयांचे नुकसान झाले. आंदोलनामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता सायंकाळी पोलीस बंदोबस्तात बसेस सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, कर्मचारी मानायला तयार नव्हते. त्यामुळे पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी १७ व १८ नोव्हेंबर २०१४ रोजी आंदोलन केले होते. महामंडळाने त्यांच्या दोन दिवसांच्या आंदोलनासाठी १६ दिवसांचे वेतन कापले होते. त्यामुळे आपण कुणावरही विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. कर्मचारी ज्या पद्धतीने लेखी आश्वासन मागतात, त्या पद्धतीने लेखी देण्याचे आम्हाला अधिकार नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांनी दिली.