शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्येंद्रचा बेत पोलिसांनी उधळला

By admin | Updated: July 13, 2015 02:35 IST

महाराष्ट, मध्यप्रदेशात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला खतरनाक गुन्हेगार सत्येंद्र गुप्ता शनिवारी रात्री जबलपूरमध्ये प्रेयसीसोबत सैरसपाटा करण्याच्या बेतात होता.

प्रेयसीसोबत करणार होता सैरसपाटा : पोलिसांनी घातली झडप नागपूर : महाराष्ट, मध्यप्रदेशात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला खतरनाक गुन्हेगार सत्येंद्र गुप्ता शनिवारी रात्री जबलपूरमध्ये प्रेयसीसोबत सैरसपाटा करण्याच्या बेतात होता. मात्र, गुन्हेशाखेच्या पथकाने त्याच्या प्रेयसीदेखतच त्याच्यावर झडप घातली आणि त्याचा सैरसपाट्याचा बेत उधळून लावला. भुशाच्या ढिगाऱ्यातून सुई शोधावी तसे मोनिका किरणापुरेचे मारेकरी शोधून काढण्याची प्रशंसनीय कामगिरी चार वर्षांपूर्वी नागपूर गुन्हेशाखा पोलिसांनी बजावली होती. तशाच प्रकारे धागादोरा नसताना तब्बल सव्वातीन महिने निरंतर प्रयत्न करून खतरनाक सत्येंद्र गुप्ताला शोधण्याची कामगिरी गुन्हेशाखेच्या पथकाने बजावली आहे. क्रूर आणि धूर्त असलेल्या गुप्तावर खुनाचे २, मोक्काचे २, खुनाच्या प्रयत्नाचे ४, दरोड्याचे ५ आणि जबरी चोरीचे २ आणि अन्य एक असे महाराष्ट्रात १६ तर, मध्यप्रदेशात ७ असे एकूण २३ गुन्हे आहेत. कारागृहातून, पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्यात तो सराईत आहे. मध्यप्रदेशातील लखनादौन कारागृहात बंदिस्त असताना तो राजा गौस, बिशन उईके, शेख वाजिद, शेख मोहम्मद आणि अमरजीत शेरसिंग या साथीदारांसह पळून गेला होता. मध्यवर्ती कारागृहातून पळून बाहेर येताच त्याने वाहन चोरले. त्याच्या ताब्यातील वाहन चोरीचे असल्याचे लक्षात आल्यामुळे बैतूल पोलिसांनी त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले. मात्र, गुप्ताने पोलिसांवर गोळीबार करीत पलायन केले. त्यानंतर तो गायब झाला. त्याला अटक करणे नागपूर पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. मात्र, शिबू आणि नेपाली पकडले गेल्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला होता. नातेवाईकांशीही संपर्क तोडला होता. त्यामुळे त्याचा धागाच पोलिसांना गवसत नव्हता. मात्र, पोलिसांचे खबरे आणि सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका वठवली. (प्रतिनिधी)प्रेयसी बनली दुवागुप्ताची जबलपुरात प्रेयसी असल्याची माहिती पोलिसांना कळली. हा दुवा पकडून पोलिसांनी गुप्ताच्या मुसक्या बांधण्याची योजना तयार केली. त्यानुसार, गुप्ताच्या प्रेयसीचा मोबाईल नंबर मिळवल्यानंतर गुन्हेशाखेचे पाच जणांचे पथक सायबर सेलच्या माध्यमातून तिच्यावर नजर ठेवू लागले. तो शनिवारी जबलपुरात तिला भेटायला येणार, हे कळाल्यामुळे तीन दिवसांपासून गुन्हेशाखेचे पथक गुप्ताची पे्रयसी ज्या भागात राहाते त्या भागात वेशांतर करून फिरू लागले. अखेर शनिवारी रात्री गुप्ताने तिला एका रेस्टॉरंटमध्ये बोलविले. ती बाहेर पडताच पोलीस सतर्क झाले. प्रेयसीला भेटायला आलेला गुप्ता नजरेस पडताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला कसलीही संधी न देता वाहनात कोंबण्यात आले. धोका पत्करलापोलिसांनी ज्या ज्या वेळी त्याला पकडण्याचे प्रयत्न केले, त्या त्या वेळी त्याने पोलिसांवर हल्ला चढवला. आता पोलिसांच्या हातात सापडलो तर पुन्हा बाहेर पडायला संधी नाही, याची त्याला खात्री होती. त्यामुळे तो झोपतानाही पिस्तुल, चाकू सोबत ठेवत होता. अशात त्याच्यावर झडप घालणे मृत्यूवर झेपावण्यासारखे होते. मात्र, गुन्हेशाखेच्या दिलेर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो धोका पत्करला. गुप्ताला जेरबंद करून नागपुरात आणण्यात आले. त्याच्याकडून १ एप्रिल ते १० जुलैपर्यंतच्या वास्तव्याची, त्याने केलेल्या गुन्ह्याची, त्याला साथ देणारांची माहिती पोलिसांनी मिळवली असून, जेल ब्रेकच्या या मास्टर मार्इंडला अटक केल्यानंतर आता गुन्हेशाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी या कामगिरीबद्दल पत्रकार परिषदेत गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांचे कौतुक केले तर, मासिरकर यांनी या कामगिरीचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना दिले आहे.