----------
इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्या
नागपूर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या मार्फत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल, वैयक्तिक थेट कर्ज, वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना सुरू झाल्या असून जिल्ह्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार होतकरू व गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर श्रीखंडे यांनी कळविले आहे.
गरजू व्यक्तींनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रहाटे कॉलनी, नागपूर या कार्यालयात अर्ज करावा.