दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राज्य मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रिपदे आली असून, सातारा जिल्ह्यातून चारजणांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्याखालोखाल जळगाव, रायगड आणि यवतमाळ जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. विभागवार विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-कोकणाला सर्वाधिक नऊ मंत्रिपदे मिळाली आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्राला ८, विदर्भाला ७ आणि मराठवाड्याच्या वाट्याला ६ मंत्रिपदे आली आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
पश्चिम महाराष्ट्र
सातारा : शंभुराज देसाई, शिवेंद्रसिंह भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटीलकोल्हापूर : हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकरपुणे : चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे, माधुरी मिसाळ
उत्तर महाराष्ट्र
जळगाव : गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारेअहमदनगर : राधाकृष्ण विखे-पाटील नाशिक : दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळधुळे : जयकुमार रावळ
मुंबई व कोकण
मुंबई : मंगलप्रभात लोढा, आशिष शेलारठाणे : गणेश नाईक, प्रताप सरनाईकरायगड : आदिती तटकरे, भरत गोगावले रत्नागिरी : उदय सामंत, योगेश कदम सिंधुदुर्ग : नितेश राणे
विदर्भ
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वालयवतमाळ : संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईकवर्धा : पंकज भोयरबुलढाणा : आकाश फुंडकर
मराठवाडा
बीड : धनंजय मुंडे, पंकजा मुंडेछत्रपती संभाजीनगर : अतुल सावे, संजय शिरसाटलातूर : बाबासाहेब पाटीलपरभणी : मेघना बोर्डीकर साकोरे
२० जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, १६ जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही. मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झालेल्या ३९ मंत्र्यांचे जिल्हे यात गृहीत धरले आहेत.