शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक संमेलनाध्यक्षपदासाठी सासणे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST

नाशिक संमेलनाध्यक्षपदासाठी सासणे, वाघमारे, अवचटांच्या नावाची चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अ.भा. मराठी साहित्य ...

नाशिक संमेलनाध्यक्षपदासाठी सासणे,

वाघमारे, अवचटांच्या नावाची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली असून, वेगवेगळी नावे पुढे येत आहेत. भारत सासणे, डाॅ.जनार्दन वाघमारे यांच्यासोबतच समाजसेवक, चित्रकार डॉ.अनिल अवचट यांना संमेलनाध्यक्ष बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

साहित्य महामंडळ आणि त्या अनुषंगाने होणारे साहित्य संमेलन ही कायम अग्नीची माळ असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे. हेवेदावे, द्वेष-मत्सर, आरोप-प्रत्यारोपाचे बिगुल कायम वाजत राहण्याचे नावच साहित्य संमेलने होत, असेच म्हणावे लागेल. २४ जानेवारीला महामंडळाकडून संमेलनाध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे आणि त्यासाठी घटकसंस्थांनी १२ जानेवारीपासून महामंडळाकडे इच्छुकांची नावे पाठविण्यास सुरुवात झाली आहे. १९ जानेवारी रोजी महामंडळाकडे ही नावे सर्व घटकसंस्थांकडून पोहोचतील. त्यानंतरच सर्वानुमते अथवा बहुमताने अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्याच अनुषंगाने विविध पुस्तकांचे लेखक, व्यसनमुक्तीच्या कार्यात अग्रेसर आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी डॉ.अनिल अवचट यांना संमेलनाध्यक्ष करावे, अशी मागणी जोर पकडू लागली आहे. त्यासाठी महामंडळाकडे पत्रही पाठविण्याचे आवाहन करणारी पोस्ट सोशल माध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध लेखक भारत सासणे, जनार्दन वाघमारे व डॉ.रवींद्र शोभणे यांच्या नावाची चर्चा होती. त्यात आणखी एका नावाची भर पडल्याने चर्चांचा फड रंगण्यास सुरुवात झाली आहे.

महामंडळ अध्यक्ष विवंचनेत!

साहित्य वर्तुळातून नावांची चर्चा जाहीरपणे केली जात असल्याने कौतिकराव

ठाले-पाटील विवंचनेत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी कुणालाच नावांची चर्चा करून संबंधित साहित्यिकांचा अपमान वा अतिरिक्त मान वाढवू नका, असे आवाहन केले आहे.

नागपुरातून अनेक नावांची एक पोस्ट व्हायरल

सोमवारीच नागपुरातून एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात आतापर्यंत संमेलनाध्यक्ष न झालेले आणि झालेल्या अध्यक्षांपेक्षा कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या साहित्यिकांची नावे समाविष्ट आहेत. ऊठसूट कुणालाही संमेलनाध्यक्ष बनविण्यापेक्षा लायक व्यक्तीच्याच गळ्यात ती माळ पडावी, अशी अपेक्षा त्या पोस्टमध्ये व्यक्त केली गेली आहे.

.........