शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत नागपूरच्या सान्याला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 10:48 IST

१४ वर्षीय खेळाडू सान्या पिल्लई हिने द. कोरियात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेच्या १७ वर्षे मुलींच्या ५४ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १४ वर्षीय खेळाडू सान्या पिल्लई हिने द. कोरियात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेच्या १७ वर्षे मुलींच्या ५४ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. १९ देशांचे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.सान्याने आपल्या गटात चीन, लाओस, फिलिपिन्स आणि कोरियाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध विजय मिळविले. सान्या ही मनोज आणि खुशी पिल्लई यांची कन्या असून काटोल रोड येथील सेंटर पॉर्इंट स्कूलची नवव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्शल आर्टकडे वळलेल्या सान्याने किक बॉक्ंिसग, तायक्वांडो आणि सिकईसारख्या मार्शल आर्ट प्रकारात स्वत:च्या कामगिरीचा अल्पावधीतच ठसा उमटविला आहे.सिनियर गटात ब्राऊन बेल्टची मानकरी असलेल्या सान्याने याआधी विविध स्पर्धांमध्ये ३२ सुवर्णांसह ४२ पदके जिंकली आहेत.स्पर्धेतून परतल्यानंतर चाहते आणि आप्तेष्टांनी सान्याचे विमानतळावर जल्लोषात स्वागत केले. पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली,‘भारताच्या तुलनेत कोरियातील तापमान अतिशय थंड होते. आम्ही अशा वातावरणाशी एकरुप झालो. विरोधी खेळाडूंच्या किक तसेच चपळता चांगली होती. त्यांच्या खेळाचे सूक्ष्म निरीक्षण करीत विजयासाठी डावपेच आखले. नेमके कसे खेळायचे यासाठी कोचशी संवाद साधला. या सर्व गोष्टींचा लाभ झाला.’ अंतिम सामन्यात कोरियाच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध अतिशय चुरशीची झुंज झाली, असे सान्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सिकई मार्शल आर्टचे संस्थापक मझहर खान हे सान्याचे मार्गदर्शक असून युगांत उगले आणि नीलेश सोमकुसवार हे कोच आहेत.सान्याच्या कामगिरीने प्रभावित होऊन टायटन कंपनीने तिला ‘टायटन कन्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर’ नेमले आहे. मुलींनी मार्शल आर्टसारख्या खेळात करियर करावे आणि समाजात खंबीरपणे वाटचाल करावी, असा संदेश देण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सान्याने सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक