शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

संतोषला मुंबईच्या ‘भाई’ची रसद

By admin | Updated: March 4, 2016 03:00 IST

पोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा देत विविध दरबारात हजेरी लावणारा नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला फरारीच्या कालावधीत मुंबईच्या ‘भाई’ने रसद पुरविल्याची चर्चा आहे.

खास माणसेही सोबत : ठिकठिकाणी देवदर्शन नरेश डोंगरे नागपूरपोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा देत विविध दरबारात हजेरी लावणारा नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला फरारीच्या कालावधीत मुंबईच्या ‘भाई’ने रसद पुरविल्याची चर्चा आहे. काळजी घेण्यासाठी भाईची काही खास माणसेही संतोषच्या सोबत होती. दरम्यान, भाई वगळता नागपुरातील साऱ्याच मित्रांनी झिडकारल्याने संतोषला सारे देव आठवले. त्यामुळे तो देवदर्शन करीत फिरला. त्यानंतर याच भाईच्या सल्ल्याने संतोषने पोलिसांकडे शरणागती पत्करल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. बिल्डरकडून तगडी सुपारी घेतल्यानंतर ‘पोस्टर गँग’ने मनीषनगरातील स्वप्नील बिडवईच्या निवासस्थानी तोडफोड करून त्याच्या घरावर कब्जा केला होता. सुपारीची तगडी रक्कम मिळाल्यानंतर पोस्टर गँगने शहरात होर्डिंगबाजी करून नागपूरकरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्याची जोरदार चर्चा सुरू होताच सोनेगाव पोलीस ठाण्यात बिल्डरसह पोस्टर गँगचा युवराज माथनकर, गौतम भटकर यांच्यासह ३० ते ४० आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्याची चर्चा सुरू असतानाच नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा भाई संतोष आंबेकरने २६ जानेवारीला भव्य रॅली काढून ‘देशभक्ती’ची धून वाजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही रॅलीच अनेकांना खटकणारी ठरली. २७ तारखेला या रॅलीबाबत लकडगंज ठाण्यात संतोष पोलिसांकडे खुलासा करीत होता. तर त्याच वेळी बिडवईच्या प्रकरणात ‘सुपारी’ गिळल्याचे उघड झाल्यामुळे सोनेगाव ठाण्यात संतोषसह ‘पोस्टर गँग’मधील ११ जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला. ते कळताच संतोष नागपुरातून पसार झाला. २८ जानेवारीपासून पोलीस त्याचा इंदोर, मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी शोध घेत होती. जागोजागी छापे घातले जात होते, मात्र तो काही हाती लागत नव्हता. त्याने पोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा दिला. दरबारात पूजा-अर्चना इतवारीच्या बंगल्यात दरबार भरवून अनेक प्रकरणांत मांडवली घडवून आणणारा संतोष फरारीच्या कालावधीत विविध ठिकाणच्या दरबारात जाऊन आला. प्रारंभी निजामुद्दीनला (दिल्ली) मथ्था टेकल्यानंतर तेथून वैष्णोदेवी मातेच्या दरबारात पोहोचला. तेथे माताराणीचे दर्शन घेऊन कटरा येथे परतल्यानंतर संतोषने अजमेरचा दर्गा गाठला. येथे नतमस्तक झाल्यानंतर जयपूर आणि परत तो शिर्डीला आला. साईबाबांच्या दरबारात पूजा-अर्चना केल्यानंतर आता काय करायचे, कुठे जायचे, असा त्याला प्रश्न पडला होता. कारण ‘भाई‘ वगळता संतोषला प्रत्येकांनीच झिडकारले होते. त्यामुळे त्याने भाईच्या सल्ल्यावरूनच शिर्डीहून थेट नागपूर गाठले आणि पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचला.