शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

संथारा संतुष्ट जीवनाची श्रेष्ठ क्रिया

By admin | Updated: August 23, 2015 03:06 IST

जैन धर्माच्या संथारा प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध श्री जैन सेवा मंडळाने सोमवारी २४ आॅगस्ट रोजी देशव्यापी बंद आणि मूक रॅलीचे आयोजन केले आहे.

राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जैन समाजाची मूक रॅलीनागपूर : जैन धर्माच्या संथारा प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध श्री जैन सेवा मंडळाने सोमवारी २४ आॅगस्ट रोजी देशव्यापी बंद आणि मूक रॅलीचे आयोजन केले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी देशभरातील जैन समाज एकजूट झाला असून स्थानिक स्तरावर या निर्णयाचा विरोध करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शनिवारी इतवारी भाजी मंडीस्थित अहिंसा भवनमध्ये पत्रपरिषद आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात जैन धर्माचे सर्व पंथ श्वेतांबर, दिगंबर, स्थानकवासी, तेरापंथी आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंचावर जैन संत आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वरजी, जैन मुनिश्री विनयसागरजी महाराज, मुनिश्री प्रशमरतिविजयजी महाराज, मुनिश्री रविनंदीजी महाराज, गिरनारसागरजी महाराज, साध्वी प्रफुल्लाजी, साध्वी विनम्रमतिजी उपस्थित होते. आचार्यश्री पूर्णचंद्र सुरीश्वरजी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, आम्ही आत्मा मानतो आणि आत्महत्येला विरोध करतो. संथारा एक आध्यात्मिक क्रिया आहे. आम्ही स्वत: रोज झोपतेवेळी संथारा करतो. मुनिश्री प्रशमरतिविजयजी महाराज म्हणाले की, संथारा त्या व्यक्तींसाठी आहे की, ज्या वृद्धावस्था, आजारपण, दुर्घटना आदी कारणांनी स्वत:च मृत्यूच्यानजीक पोहोचलेल्या आहेत. ज्यांची जीवन जगण्याची इच्छा समाप्त झालेली आहे, इच्छा नसलेला म्हणजेच संथारा होय. ही सती प्रथा नव्हे. प्रफुल्लाश्रीजी म्हणाले की, संथारा ही मृत्यूला महोत्सव बनविणारी श्रेष्ठ क्रिया आहे. या प्रसंगी जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता, कार्याध्यक्ष दिलीप गांधी, महामंत्री सतीश पेंढारी, कोषाध्यक्ष रवींद्र आग्रेकर, नरेश पाटणी, सुरेश आग्रेकर, सुमत लल्ला, महेन्द्र कटारिया, निखील कुसमगर, गणेश जैन, संजय टक्कामोरे, दीपक शेंडेकर, मनोज बंड, रिचा जैन, संतोष पेंढारी, रोहित शाह, दिलीप रांका, ज्ञानचंद बरैया, दिनेश बेताला, सुभाष कोटेचा, मगनभाई दोशी, रमेश शाह, संतोष नेताजी, रतनदादा जैन, इंदरचंद पेटीस, महेन्द्र सिंघवी, कांतिलाल झामड, नरेन्द्र कोठारी, उमेश कोठारी, जितेन्द्र तोरावत, सुरेश डायमंड, दिलीप राखे, सुनील पेंढारी, छाया जैन, कश्मीरा पटवा, किरण मोहता, शीला उदापुरकर, अनिता गोठी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)अशी निघेल मूक रॅलीजैन समाजाच्यावतीने राजस्थान हायकोर्टच्या निर्णयाविरुद्ध संथारा प्रथेच्या समर्थनार्थ सोमवारी २४ आॅगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. एक दिवस व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवणे, कार्यालयांमधून एक दिवसाची सुटी घेणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याबाबत जैन समाजाच्या लोकांना आवाहन करण्यात आले आहे. दुपारी १.३० वाजता गांधीबागेतील गांधी पुतळा चौकातून जैन साधू-साध्वींच्या नेतृत्वात मूक रॅली निघेल. ही रॅली कस्तूरचंद पार्क येथे विसर्जित होईल. या ठिकाणाहून एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावांचे निवेदन सादर करतील.