शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

संस्कृत सर्वसामान्यांची भाषा व्हावी; महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 20:23 IST

Nagpur News संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा काही लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

ठळक मुद्देमहाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा काही लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. (Sanskrit should be the language of the common man)

उच्च शिक्षण विभाग तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवारी रामटेक येथे करण्यात आले होते. तीत सावंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल, आ. अभिजित वंजारी यांच्यासह कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, उज्जैनच्या महर्षि पाणिनि संस्कृत व वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजयकुमार, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रकाश बच्छाव, नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने सन्मानित सत्कारमूर्तींनी संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सामाजिक कार्य यापुढेही अविरतपणे सुरू ठेवावे, असे आवाहन सावंत यांनी याप्रसंगी केले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ केवळ रामटेक पुरतेच मर्यादित न राहता त्याची उपकेंद्रे रत्नागिरीसह पुणे, परभणी तसेच जळगाव येथे सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत भाषेची व्यापकता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराची परंपरा यापुढे अखंडितपणे सुरु राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संस्कृत भाषा केवळ शिकून उपयोग नाही तर ती बोलता यावी व दैनंदिन व्यवहारात तिचा उपयोग व्हावा, यासाठी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर ‘संस्कृत भाषा वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल. तसेच मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकामध्ये कुलगुरु वरखेडी यांनी महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराविषयी माहिती दिली. या सोहळ्यामध्ये २०१५ ते २०२० या कालावधीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

यावेळी ४८ सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र तसेच रोख २५ हजार रुपयांची रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे सहा गट आहेत. त्यामध्ये प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक व इतर, संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक, संस्कृत कार्यकर्ता तसेच अन्य राज्यातील संस्कृत पंडितांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संचालन प्रा. पराग जोशी तर महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार समितीच्या सचिव प्रा. कविता होले यांनी आभार मानले.

 यांचा झाला गौरव- अशोक विष्णू कुलकर्णी, प्रमोदशास्त्री प्रकाशराव कुलकर्णी, पंडित कृष्णशास्त्री जोशी, पंडित श्रीहरी धायगुडे, पंडित राजेश्वर विश्वासशास्त्री देशमुख घोडजकर यांना प्राचीन संस्कृत पंडित या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- मनोज बालाजी जोशी, वेदचूडामणी दत्तात्रोय पांडुरंग नवाथे (घनपाठी), विश्वनाथ केशवराव जोशी, पंडित दत्तात्रय महादेव मुखणे, पंडित रवींद्र दत्तात्रय पैठणे, पंडित देशिक नारायण कस्तुरे यांना वेदमूर्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- मंगला सोमनाथ गुडे विश्वेकर, दत्ताराम तुकाराम नंदापुरे, डॉ. शैलजा रानडे, अरविंद महादेव गोसावी (कवठेकर), दुर्गा अरविंद पारखी, डॉ. माधव गोविंद भुस्कुटे, डॉ. हेमा विलास डोळे, डॉ. विजया विलास जोशी, डॉ. ज्योत्स्ना उपेंद्र खरे, डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे, डॉ. गजानन वामनराव आंभोरे, तर डॉ. माधवी दीपक जोशी यांना संस्कृत शिक्षक व इतर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- डॉ. शारदा रमेश गाडगे, डॉ. छाया रावसाहेब पालकर, डॉ. सरोजा भाटे, डॉ. विजया रामचंद्र जोशी, डॉ. ललिता दीपक नामजोशी, प्रा. डॉ. जयश्री दिलीप साठे, प्रा. डॉ. इंदू चंद्रशेखर देशपांडे, डॉ. रजनी रामचंद्र जोशी, डॉ. मधुसूदन पेन्ना, डॉ. महेश अशोक देवकर, डॉ. मल्हार अरविंद कुळकर्णी, डॉ. कल्पना आठल्ये यांना संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- प्रभा श्रीकृष्ण घुले, डॉ. हंसश्री सतीश मराठे, डॉ. माधव गजानन केळकर, संजीव गोविंद लाभे, डॉ. अजय रामचंद्र निलंगेकर; तर तरंगिणी नरेंद्र खोत यांना संस्कृत कार्यकर्ता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- प्रा. डॉ. सिद्धार्थ यशवंत वाकणकर, डॉ. श्रीकिशोर मिश्र, गजानन लक्ष्मीनारायण भट्ट, डॉ. हर्षदेव माधव, प्रा. पुष्पा दीक्षित, आनंदतीर्थ व्ही. नागासंपिगे यांना अन्य राज्यांतील संस्कृत पंडित या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; तर वेंकटरमण रामचंद्र दीक्षित शास्त्री यांना प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र