शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संजीव चौधरी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:03 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल व राज्याच्या विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाचा हा सन्मान असल्याचे मानले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल व राज्याच्या विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांची महाराष्ट्र आरोग्यविज्ञानविद्यापीठ, नाशिकच्या व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाचा हा सन्मान असल्याचे मानले जाते.डॉ. चौधरी यांनी अस्थिरोग विभागात भरीव कामगिरी केली आहे. भारतात पन्नासीवरील महिलांची हाडे ठिसूळ करून कर्दनकाळ ठरणारा ‘ऑस्टिओपोरोसिस’ या आजाराच्या जनजागृतीसाठी त्यांनी ‘हीटको’ (हेल्थ एज्युकेशन अ‍ॅण्ड टेलिकन्सल्टेशन ऑन ऑस्टीओपोरोसिस) हा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. संगणक व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातील महिलांना या आजाराची माहिती देऊन त्यावरील उपाययोजनांबाबत मागदर्शन करीत आजाराशी लढण्यास ते सशक्त करीत आहेत. त्यांनी निवडलेल्या ११७ गावांपैकी आतापर्यंत ५२ गावांमध्ये हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. स्त्री सशक्तीकरणाचा हा नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाय जगभरात प्रशंसनीय ठरला आहे.डॉ. चौधरी यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नेपाळ येथे ‘ग्लोबल हेल्थ क्रसेडर ऑफ इयर’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते विदर्भ ऑर्थाेपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. यादरम्यान त्यांनी विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या व्यवसायातील महिलांमध्ये ‘ऑस्टीओपोरोसिस’ या आजाराच्या प्रमाणाचा सखोल अभ्यास केला. त्यावर आधारित ‘श्वेत पत्रिका’ भारत सरकारला सुपूर्द करून आजाराच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष वेधले. गांग्झाऊ चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑस्टीओपोरोसिसच्या संमेलनात ‘भारतीय पर्यावरण व ऑस्टीओपोरोसिस’ या त्यांच्या शोधप्रबंधाला प्रथम पुरस्कारही मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. चौधरी हे ‘पॅराप्लेजिया’ या आजाराने पीडित रुग्णांच्या पुनर्वसनाकरिता अविरत कार्य करीत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या ‘ऑस्कर’ संघटनेमधून कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कंबरदुखी व पाठदुखीवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर कार्यशाळा घेतल्या आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अवॉर्ड व समाजभूषण पुरस्कारानेदेखील डॉ. चौधरी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :universityविद्यापीठHealthआरोग्यscienceविज्ञान