शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

कृष्णधवल गीतांच्या सिनेगीतांनी रंगली सांज

By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST

आपले अवघे जीवन संगीतमय करणारे काही मोजके कलावंत कायम रसिकांना प्रिय असतात. कृष्णधवल चित्रपटांचा काळ हा सुवर्णयुग मानला जातो. त्या काळातील दिग्गज गायक के. एस. सैगल, नूरजहाँ, लता,

नागपूर : आपले अवघे जीवन संगीतमय करणारे काही मोजके कलावंत कायम रसिकांना प्रिय असतात. कृष्णधवल चित्रपटांचा काळ हा सुवर्णयुग मानला जातो. त्या काळातील दिग्गज गायक के. एस. सैगल, नूरजहाँ, लता, आशा, गीता दत्त, मन्नाडे, मुकेश, किशोरकुमार आदींच्या मूळ स्वरातील अमिट सिनेगीतांच्या कार्यक्रमाने आज रसिकांना जिंकले. आविष्कार संगीत अकादमी आणि स्पर्श संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. दृकश्राव्य माध्यमात सादर झालेला हा कार्यक्रम उपस्थितांना आनंदाचा ठेवा होता. आविष्कारचे संचालक अनिरुद्ध जोशी, रसिका चाटी-जोशी, अवंतिका बोपोरीकर, अवंती पाध्ये यांनी तयारीने सादर केलेल्या भावपूर्ण अनुभूतीच्या नितांत श्रवणीय गीतांमुळे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांना स्वरानंदाचा अनुभव घेता आला. अनिरुद्ध आणि रसिका यांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला यावेळी रसिकांचा प्रतिसाद लाभला. संजय दमाणी व डॉ. सुधीर कुन्नावार यांनीही यावेळी काही गीते सादर करून रसिकांची दाद घेतली. अवंतिकाने ‘आजा रे परदेसी...’ आणि अवंतीने ‘जुलमी संग आख लडी...’ या गीतांनी माहोल केला. अनिरुद्धने मूळ सैगल यांच्या स्वरातील ‘हम जी के क्या करेंगे जब दिल ही टूट गया...’ या भावपूर्ण गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर ‘पुछो ना कैसे मैने रैन बितायी...’ अवंतिकासह ‘ये रात भिगी भिगी...’ तर रसिकासोबत ‘मेरे पिया गये रंगून...’ आदी गीतांनी या कार्यक्रमात रंगत वाढविली. रसिकाने ‘आवाज दे कहाँ है..., जवाँ है मोहोब्बत...’ ही गीते तबीयतीने सादर केली. संजय दमाणी व रसिका यांनी ‘आजा सनम मधुर चाँदनी मे हम...’, सुधीर कुन्नावार व रसिका यांच्या स्वरात ‘दिल ए नादान तुझे हुआ क्या है...’ सादर करण्यात आले. याशिवाय ‘ले के पहला पहला प्यार..., बेकरार करके हमे .., प्यार किया तो डरना क्या.., कुहू कुहू बोले कोयलिया...’ आदी गीतांनी कार्यक्रम उंचावर गेला. मुकुंद देशपांडे आणि श्वेता शेलगावकर यांचे निवेदन होते. अशोक टोकलवार, रिंकु निखारे, सुभाष वानखेडे, महेंद्र ढोले, अक्षय आचार्य, पंकज यादव यांनी वाद्यसंगत केली. राजेश अमीन यांची आकर्षक सजावट होती. स्टेट बँक आॅफ इंडियाचे उच्च पदाधिकारी फणसे, विजय दमानी, नाईक उपलंचीवार यांनी उद्घाटन केले. (प्रतिनिधी)