शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  चक्क दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर विक्री! २५ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 22:06 IST

देशी दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून बाजारात विक्री करणाऱ्या प्रमोद जयस्वाल यांच्या वर्धमाननगर येथील रॉयल ड्रींक्स या मद्य कारखान्यातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी २५ लाख रुपयांचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला.

ठळक मुद्देदारू उत्पादकाला सॅनिटायझर निर्मितीचा परवाना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशी दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून बाजारात विक्री करणाऱ्या प्रमोद जयस्वाल यांच्या वर्धमाननगर येथील रॉयल ड्रींक्स या मद्य कारखान्यातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी २५ लाख रुपयांचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला. काही दिवसापासून रॉयल ड्रींक्सतर्फे चक्क दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून विकण्यात येत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.काही मद्यपिंनी मद्य समजून सॅनिटायझरचे सेवन केल्याची प्रकरणे पुढे आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. अन्न व औषध प्रशासनाने कारखान्यातील सॅनिटायझरच्या विक्रीवर प्रतिबंध आणून बाजारातील साठा परत बोलविण्यासाठी जयस्वाल यांना निर्देश दिले आणि तयार माल जप्त केला. यातील काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जयस्वाल यांनी चार बॅचेसचा माल बाजारात विक्रीसाठी पाठविला आहे.सॅनिटायझर बनवून विकताना जयस्वाल यांनी सुरक्षा नियमांचे पालन केलेले नाही. परवाना देताना सॅनिटायझरच्या बॉटल्समध्ये भरून विकण्याचे नियम होते. पण देशी दारूच्या ९० आणि १८० मिलिलिटरच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून विकण्यात आले. या बॉटल्स विक्रीसाठी बाजारात गेल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या सॅनिटायझरच्या बॉटल कोणत्या परिसरात विकल्या गेल्या आहेत, त्याचा शोध प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. बॉटलचे पॅकिंग सॅनिटायझरसारखे नसल्याने मद्यपींकडून मद्य समजून पिण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. हा धोका ओळखून अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. सॅनिटायझर तपासणीचा अहवाल आल्यानंतर उत्पादकावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.तपासणीविना बॉटलची परस्पर विक्रीकोरोना व्हायरसमुळे बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर शासनाने मद्य उत्पादकांना सॅनिटायझर उत्पादनासाठी २४ तासात परवाना देण्याचे आदेश दिले. त्यानुसार १५ दिवसापूर्वी देशी दारूचे उत्पादन करणाऱ्या रॉयल ड्रींक्सला सॅनिटायझर निर्मितीचा परवाना शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे देण्यात आला. सॅनिटायझरच्या निर्मितीनंतर पहिली बॉटल विभागाकडे आणून देण्याचे निर्देश दिले होते. पण जयस्वाल यांनी बॉटल आणून न देता आणि तपासणीविना बाजारात परस्पर विक्री सुरू केली. याची विभागाने गंभीर दखल घेतली आहे.प्रकाश शेंडे, सहआयुक्त (औषध), अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :raidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग