शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये देणार 'सॅनिटरी पॅड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:47 IST

नागपूर महापालिकेच्या २८ शाळातील सुमारे साडेतीन हजारांवर असलेल्या विद्यार्थिनींना मनपातर्फे सॅनिटरी पॅड पुरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे ‘डिस्पोज युनिट’चीही करणार व्यवस्था : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’च्या प्रस्तावावर मनपा करणार अंमलबजावणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेच्या २८ शाळातील सुमारे साडेतीन हजारांवर असलेल्या विद्यार्थिनींना मनपातर्फे सॅनिटरी पॅड पुरविण्यात येणार आहे. वापरानंतर त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावता यावी यासाठी प्रत्येक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोज युनिट लावणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.महापालिकेद्वारे संचालित साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळेत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘नई दिशा’ अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा वाशीमकर, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या नसरीन अन्सारी उपस्थिती होती.आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेने महापालिकेच्या २८ शाळांमधील किशोरवयीन मुलींच्या समस्या, त्यासाठी जनजागृती, आवश्यक बाबी यासंदर्भात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था शाळेत आहे अथवा नाही, व्यवस्था असली तरी मुली त्याचा उपयोग करतात अथवा नाही, बाथरुममधील अस्वच्छता, शाळांमध्ये सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था आहे अथवा नाही, विद्यार्थिनींच्या अपेक्षा काय, आदी प्रश्नांबाबत माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे संस्थेने नागपूर महानगरपालिकेकडे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये काय सोईसुविधा असायला हव्या,याबाबत एक प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावानुसार, शाळेत सॅनिटरी पॅडचा नियमित पुरवठा करण्यात यावा, सॅनिटरी पॅड विल्हेवाटीसाठी डिस्पोज युनिट असायला हवे, स्वच्छतागृहांमध्ये पाणी व स्वच्छतेची सोय व मुलींसाठी पुरेशी सुरक्षित व्यवस्था असावी, मासिक पाळी विषयक आरोग्य संबंधाने सल्ला व समुपदेशन व्यवस्था असावी, शिक्षण विभागाने मासिक पाळी स्वच्छतेकरिता शाळा स्तरावर सुविधा उपलब्ध करण्याकरिता अर्थसंकल्पात तरतूद करावी असे सुचविले होते.यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थिनी यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या दृष्टीने साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी संस्थेने दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करीत सॅनिटरी पॅडसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही दिली. लवकरच प्रत्येक शाळांमध्ये ‘डिस्पोज युनिट’ लावण्यात येईल, असे सांगितले. शाळांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत आपण स्वत: लक्ष घालणार असून यापुढे स्वच्छतेत कुठलीही हयगय होणार नाही, असे आश्वासन दिले. वेळोवेळी किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असेही सांगितले.काय आहे ‘नई दिशा’ अभियान?गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात कार्यरत असलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्याबाबत विविध प्रकल्प राबविले जातात. ‘नई दिशा’ हा प्रकल्प किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कसे असावे यासाठी जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी राबविला जात आहे. नागपूर महानगरपालिकेसोबत ऑगस्ट २०१९ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली असून महापालिकेद्वारा संचालित २८ शाळांमध्ये प्रकल्प राबविण्यात आला आहे. याअंतर्गत सॅनिटरी पॅड, डिस्पोज युनिट व स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा