शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  सानिकाला भोसकणारा माथेफिरू फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:48 IST

लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) अद्याप फरारच आहे. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. दुसरीकडे सानिकाची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टर तिच्यावर शर्थीचे उपचार करीत आहेत.

ठळक मुद्देतरुणीची स्थिती चिंताजनक : पोलिसांकडून ठिकठिकाणी शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) अद्याप फरारच आहे. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. दुसरीकडे सानिकाची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टर तिच्यावर शर्थीचे उपचार करीत आहेत.लक्ष्मीनगरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सानिकाचे आरोपी हेमनानीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो खामल्यातील सिंधी कॉलनीत राहतो. त्याच्यासोबत सानिकाचे जाणे-येणेही होते. त्याचे विचित्र वर्तन सानिकाला खटकत होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तिने त्याला टाळणे सुरू केल्याने आरोपी संतापला होता. ब्रेकअप करण्यापूर्वी शेवटचे एकदा भेटू असे म्हणून आरोपी हेमनानीने तिला गळ घातली. या पार्श्वभूमीवर, रविवारी, १ जुलैला रात्री तो तिला भेटण्यासाठी अशोका हॉटेल समोरच्या सानिकाचे मामा अविनाश पाटणे यांच्या फायनान्स कार्यालयात आला. यावेळी मामा अविनाश आणि त्यांची पत्नीही कार्यालयात होती. मामासमोरच त्याने सानिकाला अनेक प्रश्न केले. तू माझ्याशी संबंध का तोडले, असा प्रश्न केला. तुझे वर्तन चांगले नाही, असे सुनावताच आरोपीने सानिकावर कट्यारसारख्या चाकूचे सपासप घाव घातले. छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. ते पाहून अविनाश मध्ये धावले असता आरोपीने त्यांच्याही हातावर चाकू मारला आणि पळून गेला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.पहाटेपर्यंत चालली शस्त्रक्रियाजखमी सानिकावर खामल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पहाटेपर्यंत तिच्यावर शस्त्रक्रिया चालली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, बजाजनगर पोलिसांनी पाटणे यांच्या तक्रारीवरून आरोपी हेमनानीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिला