शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक व हिंगणामध्ये सांगली पॅटर्न ? अपक्ष लढण्याची तयारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

By गणेश हुड | Updated: October 28, 2024 20:40 IST

रामटेक मतदार संघ काँग्रेसला मिळावा, यासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र अदृश्य शक्तीने घात केला.

नागपूर : रामटेक मतदार संघ काँग्रेसला मिळावा, यासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र अदृश्य शक्तीने घात केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीणमधील सर्व सहा मतदार संघात मोर्चेबांधणी केली होती. परिणामी लोकसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठी लीड मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीत हिंगणा व रामटेक काँग्रेसला मिळावे, असा आग्रह होता. परंतु दोन्ही जागा काँग्रेसला मिळालेल्या नाही.  सोमवारी माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या  बैठकीत  रामटेक व हिंगणा अपक्ष लढण्याचे संकेत दिले. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी सांगली पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. 

 यावेळी  खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी आमदार विजय घोडमारे,  माजी अध्यक्षा रश्मी बर्वे,  जि.प.सदस्या उज्ज्वला बोढारे, वृंदा नागपुरे,  संजय जगताप, ममता धोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, उपसभापती प्रकाश नागपुरे, श्याम मंडपे, पंचायत समिती सभापती मनोहरे यांच्यासह हिंगणा मतदार संघातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.  रामटेक विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केले. परंतु यश मिळाले नाही. हिंगणा मतदार संघासाठीही आम्ही आग्रही होतो. परंतु महाविकास आघाडीत काँग्रेसला उमेदवारी मिळालेली नाही. 

 सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर  रामटेक व  हिंगणा मतदारसंघात तयारी केली होती. परंतु दोन्ही ठिकाणी उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तिकीट वाटपात झालेल्या अन्यायावर बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

गेली पाच वर्षे आम्ही लढण्याची तयारी केली.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक असा वा ग्रामपंचात निवडणुकीत याचे चांगले परिणाम मिळाले.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या  उमेदवारासाठी पदधिकारी व  कायर्कत्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे  महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी निवडणून आला. आता  विधानसभा निवडणुकीची तयारी  केली आहे. परंतु आघाडीत काँग्रेस उमेदवाराला उमेदवाराला उमेदवारी मिळालेली नाही. यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. हिंगण्यातून दोन अर्ज दाखल करणार

बैठकीतील निर्णयानुसार  हिंगणा विधानसभा मतदार संघातून मंगळवारी महाविकास आघाडीतर्फे जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्ज्वला बोढारे व वृंदा नागपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यातील एक उमेदवारी अर्ज कायम ठेवला जाईल. याबाबतचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.