शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समता मार्चने आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:06 IST

अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० मार्चला दीक्षाभूमी येथील सभागृहात दोन दिवसीय दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संविधान चौक ते दीक्षाभूमी समता मार्च काढून या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन  केले जाणार आहे.

ठळक मुद्देदेशभरातील स्त्रीवादी लेखिका सहभागी : शनिवारी उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० मार्चला दीक्षाभूमी येथील सभागृहात दोन दिवसीय दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिलासाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संविधान चौक ते दीक्षाभूमी समता मार्च काढून या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन  केले जाणार आहे.‘आयदान’कार लेखिका ऊर्मिला पवार या संमेलनाच्या अध्यक्ष असून सार्कच्या पदाधिकारी नूर जहीर या उद््घाटक म्हणून लाभल्या आहेत. कुसुमताई तामगाडगे या स्वागताध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून घडलेल्या स्त्री लेखिकांच्या, कवयित्रींच्या, नाट्यलेखिकांच्या चिंतनाला नवा उजाळा आणि नवसाहित्यिकांना दिशा देण्याचे काम या संमेलनातून होणार आहे. जपानच्या डॉ. मिकी इनोकी, अमेरिकेच्या डॉ. वृंदा साखरकर, कर्नाटकच्या बामा याही या संमेलनात उपस्थित राहणार आहेत. शनिवारी संविधान चौक येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर पल्लवी वाहाने यांच्या नेतृत्वातील ग्रुपने ‘संविधानाची जाणीव’ हे पथनाट्य सादर केले. त्यानंतर समता मार्चला सुरुवात करण्यात आली. ऊर्मिला पवार व नूर जहीर यांच्यासह पश्चिम बंगालच्या कल्याणी ठाकूर, झारखंडच्या प्रसिद्ध कवयित्री निर्मला पुतुल, दिल्लीच्या डॉ. रजनी दिसोडिया, हेमलता, महामंडळाचे प्रा. सतेश्वर मोरे, राज्याच्या विविध भागातून आलेल्या लेखिका, कवयित्री व समीक्षक मार्चमध्ये सहभागी होत्या. महाराजबाग ते रामदासपेठ या मार्गाने होत हा समता मार्च दीक्षाभूमीवर पोहचला. येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देत समता मार्चचा समारोप झाला. आयोजनातील संबुद्ध महिला संघाच्या छायाताई खोब्रागडे, जलदा ढोके, हंसा नारनवरे, विशाखा कांबळे, सुगंधा खांडेकर, सुरेखा लोकरे, सुषमा कळमकर, पुष्पा घोडके आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.शनिवारी दीक्षाभूमीच्या सभागृहात सकाळी १० वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन  होणार आहे. यानंतर विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र, विधान चर्चा व काव्यसंमेलन अशा विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन होईल.

टॅग्स :Womenमहिलाliteratureसाहित्य