शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडवणारी समानता एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 09:55 IST

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दीक्षाभूमीवरून सुरू होऊन देशातील सर्व प्रमुख बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणारी समानता एक्स्प्रेस नावाची भारत दर्शन रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण भारतभर फिरणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दीक्षाभूमीवरून सुरू होऊन देशातील सर्व प्रमुख बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणारी समानता एक्स्प्रेस नावाची भारत दर्शन रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वेगाडी १४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता नागपूरवरून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे वेस्ट झोनचे समूह महाव्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.अरविंद मालखेडे म्हणाले, १० दिवसांच्या टुर पॅकेजमध्ये प्रवाशांना नागपूर येथील दीक्षाभूमीशिवाय मुंबईतील चैत्यभूमी, इंदूरजवळील महु, गया येथील बोधगया, वाराणशीत सारनाथ नौतनवात लुंबिनी, गोरखपूरमध्ये कुशीनगर आदी स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. समानता एक्स्प्रेसमध्ये नागपूरशिवाय वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील प्रवासी प्रवास करू शकतील. २४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या समानता एक्स्प्रेसमध्ये (स्टँडर्ड क्लास) स्लिपर क्लाससाठी प्रति प्रवासी १०,३९५ रुपये आणि थर्ड एसी (कम्फर्ट क्लास) साठी १२,७०५ रुपये प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे.

प्रवाशांना मिळेल सुविधाबौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणाऱ्या समानता एक्स्प्रेसमध्ये आयआरसीटीसीच्या वतीने प्रवाशांना खाद्यपदार्थांपासून स्थळांवर नेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी १० दिवस भोजनाच्या व्यवस्थेशिवाय धर्मशाळा, लॉज आदी ठिकाणी थांबण्याची चांगली सुविधा देण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रवासात प्रवाशांना शाकाहारी भोजन देण्यात येणार आहे. समानता एक्स्प्रेससाठी आरक्षण सुरू झाले आहे. १६ कोचच्या या गाडीत १२ स्लिपर, १ एसी थ्री टायर आणि ३ जनरल कोच राहतील. प्रवासात १०० कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी हजर राहतील. मालखेडे यांनी सांगितले की, आगामी काळात यासारख्या आणखी प्रवासी रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला आयआरसीटीसीचे रविकांत जंगले, अहद सिद्दीकी उपस्थित होते.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे