शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नागपुरात तिरळे कुणबी समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले समाजभवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:07 IST

तिरळे कुणबी समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे गिफ्ट दिले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या बिडीपेठ येथील जागेवर उभारण्यात आलेला टाऊन हॉल तिरळे कुणबी सेवा मंडळाला देण्याचा आदेश नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे बिडीपेठ येथील नासुप्रचा टाऊन हॉल मिळणार : शासकीय आदेश निघाले 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिरळे कुणबी समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे गिफ्ट दिले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या बिडीपेठ येथील जागेवर उभारण्यात आलेला टाऊन हॉल तिरळे कुणबी सेवा मंडळाला देण्याचा आदेश नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.तिरळे कुणबी सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नागपूर शहर व जिल्ह्यात कुणबी समाज आठलाखांवर असून यात तिरळे कुणबी समाज साडेचार लाखांवर आहे. एवढी मोठी संख्या असूनही समाजाला हक्काचे समाजभवन नव्हते. गेली अनेक वर्षे शासन स्तरावर पाठपुरावा करूनही सरकारकडून दिलासा मिळाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंडळाने प्रस्ताव सादर करताच दखल घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. आ. सुधाकर देशमुख व आ. सुधाकर कोहळे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजभवन देण्याचा निर्णय घेत शब्द पाळला. ३० नोव्हेंबर रोजी शासकीय आदेश जारी करीत तिरळे कुणबी समाजाला न्याय दिला, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कुणबी समाजातील सर्व शाखांसह सामान्य नागरिकांनाही सामाजिक, सांस्कृितक, शैक्षणिक सोहळ्यांसाठी समाजभवन उपलब्ध करून दिले जाईल, असेही चोपडे यांनी स्पष्ट केले.मंडळाचे सचिव विनोद बोरकुटे, उपाध्यक्ष रविप्रकाश ढोक, सल्लागार कृष्णाजी बोराटे, नामदेव कोहळे, नानाजी सातपुते, मंदाकिनी कळमकर, कोषाध्यक्ष विश्वनाथ पाटील, संचालक नरेंद्र गोरले, रवी वराडे, शंकर कडू, महादेवराव बोराडे, राजेश ढोक, लक्ष्णमराव राऊत, शिला महल्ले, प्रदीप कदम, संजय डोईफोेडे, अ‍ॅड. महेश महल्ले, अ‍ॅड. सुरेश काळे, नरेश बरडे, रिता मुळे, अशोक मुळे, विष्णु वाकोडे, सचिन नागमोते, राजु फुटाणे, प्रल्हादराव गावंडे, दिवाकर वाघ, अंबादास वानखेडे, गोविंद अखंड, मधु घाटे आदी या वेळी उपस्थित होते.असे आहे समाज भवन

  •  नासुप्रतर्फे बिडीपेठच्या आशीर्वादनगर येथे २०५५.६३४ चौ. मी. (भूखंड क्रमांक ११३२ ) जागेवर टाऊन हॉलचे बांधकाम करण्यात आले आहे.
  •  संबंधित भवनासाठी मंडळाला २ कोटी ६२ लाख रुपये नासुप्रकडे जमा करायचे आहेत.
  •  ही रक्म भरताच समाजभवन मंडळाला हस्तांतरित केले जाईल.
  • समाजभवन ३० वर्षांच्या लीजवर राहील. पुढे लीज नुतनीकरण करता येईल.
  •  भवनाच्या सौंदर्यीकरणायासाठी आणखी दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीkunbiकुणबी