शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सलाम; खूपच अवघड आहे पीपीई किट घालून उपचार करणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 07:00 IST

पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट घालून रुग्णांवर उपचार करणे एक आव्हानच आहे. ही किट घालून उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्सला भरपूर त्रास सहन करावा लागतो आहे.

ठळक मुद्देकित्येक तास पाण्याविना, लघुशंकेविना उपचारात व्यस्त

राजीव सिंहलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांच्या उपचारातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफचे कार्य कौतुकास्पद आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रकोपात त्यांचा आत्मविश्वास रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी मदतगार ठरतो आहे. शहरातील ४२ अंश तापमानात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट घालून रुग्णांवर उपचार करणे एक आव्हानच आहे. ही किट घालून उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्सला भरपूर त्रास सहन करावा लागतो आहे. त्यांच्या सात ते आठ तासाच्या ड्युटीत त्या पाणीही पिऊ शकत नाही आणि लघुशंकेलाही जाऊ शकत नाही. घामाच्या धारांनी शरीर भिजून जाते, पण त्यांच्यातील सेवेची ऊर्जा त्यांचा आत्मविश्वास डगमगू देत नाही. आज कोरोनाच्या लढाईतील सेनापती ठरलेल्या डॉक्टर व नर्सला सलाम ठोकावा असेच त्यांचे कार्य आहे.लोकमतने शहरातील काही डॉक्टरांकडून पीपीई किट घालून काम करताना किती आव्हानात्मक असते, यासंदर्भात चर्चा केली. एप्रिल व मे महिन्यात विदर्भात भीषण गरमी पडते. पारा ४७ पर्यंत जाऊन पोहचतो. सध्या तापमान ४२ ते ४३ डिग्रीदरम्यान आहे. तापमान वाढत असताना कोरोनाचे रुग्णही वाढतच आहे. कोरोनाच्या उपचारात स्वत:ला झोकून दिलेल्या डॉक्टरांना उपचार करताना पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. रुग्णावर उपचार करण्यापेक्षा पीपीई किट घालून काम करणे अधिक अवघड असल्याचा डॉक्टरांचा अनुभव आहे. सरकारने दिलेल्यादिशानिर्देशानुसार कोरोनाच्या रुग्णावर जिथे उपचार सुरू आहे, तिथे एसी लावण्यास निर्बंध आहे. आयसीयूचे वातावरण सामान्य ठेवण्यात आले आहे. अशात पीपीई किट घालून काम करताना डॉक्टरांना असहाय होत आहे. असा होतो त्रास१ ) पीपीई किट घालून ७ ते ८ तास डॉक्टरांना काम करावे लागते. दरम्यान डॉक्टरांना एन-९५ मास्क, ३ प्लायचा सर्जिकल मास्क, ग्लोव्हज व चेहरा झाकण्यासाठी प्लास्टिक कव्हर घालावे लागते.२) एकदा डॉक्टर वॉर्डमध्ये शिरले की ड्युटी संपेपर्यंत त्यांना बाहेर पडता येत नाही. या ७ ते ८ तासात त्यांना पाणीही पिता येत नाही आणि लघुशंकेलाही जाता येत नाही.३) किट घातल्यानंतर तापमानापेक्षा जास्त गरमी लागते. सातत्याने घाम येतो. मधुमेह व बीपी आदी समस्येने डॉक्टर ग्रस्त असेल तर जीवही गुदमरल्यासारखा होतो.४) सातत्याने घाम येत असल्याने शरीरातील पाण्याचा स्तर कमी होतो. खाज सुटते. डोक्यापासून पायापर्यंत डॉक्टर घामाने भिजून जातात. तरीसुद्धा पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावतात.- श्वास घेताना होतो त्रासमेयोचे उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले की, संक्रमणापासून बचाव करण्यासाठी पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. हे घातल्यानंतर निश्तिच त्रास होतो. मात्र डॉक्टरांपुढे पहिले आव्हान कोरोनावर विजय मिळविण्याचे आहे. पीपीई किट घातल्याने शरीर घामाने भिजून जाते. त्यामुळे त्वचेशी संबंधित आजार होतात. श्वास घेतानाही त्रास होतो. त्यामुळे उपचार करणे अवघड होते.- पाणीसुद्धा पिऊ शकत नाहीखासगी रुग्णालयात कार्यरत डॉ. सुशांत चंदावार म्हणाले, ड्युटीवर पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. हे घालणे व काढण्याचे नियम आहे. संक्रमण टाळण्यासाठी पीपीई किट आवश्यक आहे. किट घातल्यानंतर ६ ते ७ तास जेवण व पाणी शक्य नाही. शिफ्टदरम्यान लघुशंकेला जाणे शक्य नाही. आम्ही तर युवा आहोत, पण जे डॉक्टर वृद्ध आहेत त्यांना होणारा त्रास सांगू शकत नाही. कोरोनाच्या भीतीने एसी बंद ठेवावा लागतो. डोक्याच्या केसापासून बोटाच्या नखापर्यंत वॉटरप्रूफ पीपीई किटने आम्ही घामाघूम होऊन जातो.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस