शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

स्वार्थाने भरलेल्या युगात, कुलींच्या समर्पणभावाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:52 IST

स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्धही केले. अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.

ठळक मुद्देअडचणीतील प्रवाशांना देतात विनाशुल्क सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्धही केले. अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.अडचणीतील प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वेस्थानकावरील कुली तत्पर असतात. मागील महिनाभरात घडलेल्या दोन घटनांनी कुलींचा सेवाभाव समोर आला. ७ जूनला पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या एसीमध्ये बिघाड झाला. एसी दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रवाशांनी बडनेरा, वर्धा स्थानकावर गोंधळ घातला. प्रवासी गोंधळ घालत असल्याची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला समजताच येथील अधिकाऱ्यांनी ए-१ कोच तयार ठेवला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच प्रशासनाने नादुरुस्त झालेला ए-१ कोच तातडीने बदलून नवा कोच गाडीला जोडला. गाडीला विलंब होऊ नये म्हणून अधिकाºयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांच्या नेतृत्वाखाली सुशील अवतार, सोनु गायकवाड, लखन लाल सैनी, नौशाद खान, नफीस अहमद, छोटे खान, अमर सिंह जोगी, नितीन बारामती आदी कुलींनी नि:शुल्क सेवा देत एक रुपयाही न घेता सर्व प्रवाशांचे सामान नव्या कोचमध्ये पोहोचविले. कुलींच्या सेवेबद्दल प्रवाशांनीही त्यांना मनापासून धन्यवाद दिले. ही एकच घटना नव्हे तर १५ दिवसांपूूर्वी गोरखपूर-यशवंतपूर गाडीचे चाक तुटल्यानंतर ही गाडी सोनखांब-कोहळी स्थानकादरम्यान तब्बल ५ तास जागेवरच उभी होती. या गाडीचे चाक तुटलेल्या कोचमधील प्रवाशांचे सामानही कुलींनी विनाशुल्क हलविण्यास मदत केली होती. याशिवाय रेल्वेस्थानकावर असंख्य वेळा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मदत करण्याचे काम रेल्वेस्थानकावरील कुली करत राहतात. पैशासाठी एकमेकांचा गळा कापण्याच्या युगात कुलींचा हा सेवाभाव समाजाला नक्कीच प्रेरणा देणारा आहे.११ लाखाचे दागिने केले होते परतदोन वर्षापूर्वी रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केटकडील कडील भागात एक महिला आपली बॅग पोलीस बुथजवळ विसरली.बराच वेळ होऊन सुटकेसजवळ कोणीच येत नसल्याचे पाहून कुली अब्दुल मजीद यांनी ती सुटकेस आपल्या ताब्यात घेतली. बॅगमध्ये वाजत असलेला मोबाईल उचलून संबंधीत महिलेला बॅग आपल्याजवळ असल्याचे सांगितले. ती महिला आल्यानंतर त्या बॅगमध्ये ११ लाखाचे दागिने असल्याचे समजले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरEmployeeकर्मचारी