शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कर वसुलीसाठी स्टार बसची विक्री

By admin | Updated: August 23, 2015 03:09 IST

वंश निमयकडे बालक पालनपोषण कर, प्रवासी कर व वाहन कर असे मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये थकीत आहे.

आरटीओ गंभीर : पुन्हा सहा बसेस जप्त नागपूर : वंश निमयकडे बालक पालनपोषण कर, प्रवासी कर व वाहन कर असे मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये थकीत आहे. हा कर भरावा म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने शनिवारी पुन्हा सहा बसेस जप्त केल्या. आतापर्यंत आरटीओने ९८ बसेस जप्त केल्या आहेत. परिणामी, शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. विशेष म्हणजे, महिना होऊनही जप्त करण्यात आलेल्या बसेस थकीत कर भरून सोडविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे आरटीओ प्रशासन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार या बसेसची विक्री करून कर वसूल करण्याचा विचारात आहे. वंश निमयने २००७ पासून प्रवासी कराचा एकही रुपया भरलेला नाही. २०१३ पासून वाहन करही भरलेला नाही. हे दोन्ही कर व पालनपोषण कर मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये वंश निमयकडे थकीत आहे. कराची ही रक्कम वंश निमयने प्रवाशांकडून वसूल केली आहे. परंतु थकीत रक्कम भरण्यास मुदतीवर मुदत देऊनही टाळटाळ करीत आहे. याची गंभीर दखल घेत आरटीओने २ आॅगस्ट रोजी ६३, १० आॅगस्ट रोजी १६, १७ आॅगस्ट रोजी १३ तर शनिवारी ६ बसेस जप्त केल्या. सध्या आरटीओ कार्यालयात बसेस ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. यातच महिना होऊही वंश निमयने थकीत कर भरून जप्त बसेस सोडविलेल्या नाहीत. याची गंभीर दखल आरटीओ प्रशासनाने घेतली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री करून कर वसूल केला जाऊ शकतो. त्यानुसार आरटीओने या संदर्भात विचार सुरू केला आहे. असे झाल्यास महिन्याभराच्या कालावधीत बस विक्रीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एका बसच्या विक्रीतून आरटीओला पाच लाख मिळू शकतात. परंतु जाणकारांच्या मते ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वंश निमय थकीत कर भरण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी) आरटीओवर दबावचौथा शनिवार, सुटीचा दिवस असतानाही आरटीओ शहर कार्यालयाच्या वायुपथकाने स्टार बसवर जप्तीची कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कारवाई थांबविण्यासाठी आरटीओवर दबाव आणण्यात आला. नियमानुसार आरटीओ, शहर कार्यालय आपले कर्तव्य बजावत आहे, मात्र या दबावतंत्रामुळे कारवाई थांबविली जाते की सुरू राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.