शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  सॅनिटायझरची दारू म्हणून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 22:46 IST

सॅनिटायझरची दारू म्हणून विक्री करणाऱ्या कुणाल संजय बैसवारे नामक आरोपीला सदर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सॅनिटायझरच्या १८० एमएलच्या २९ बॉटल्स जप्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देआरोपी गजाआड : सदर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सॅनिटायझरची दारू म्हणून विक्री करणाऱ्या कुणाल संजय बैसवारे नामक आरोपीला सदर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सॅनिटायझरच्या १८० एमएलच्या २९ बॉटल्स जप्त करण्यात आल्या.नागपुरातील वर्धमाननगरातील एका मद्य बनविणाºया कंपनीने रॉयल अल्कोहल नावाने सॅनिटायझरची निर्मिती करून ते सॅनिटायझर दारूच्या बॉटल्सयध्ये भरले. या बॉटल्स बाजारपेठेत विकायला आल्या आहेत. सॅनिटायझरला दारू आहे, असे म्हणत काही जणांनी त्याचा विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. आरोपी कुणाल बैसवारे यानेही सदर भागात तळीरामांना ही दारू आहे असे म्हणून या बॉटल्स विकणे सुरू केले. त्याची माहिती कळताच सदरचे ठाणेदार महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक विलास माटे, अजय गर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी रात्री कुणाल बैसवारेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सॅनिटायझरच्या २९ बॉटल्स जप्त करण्यात आल्या. या कारवाईची माहिती पोलिसांनी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या पथकाला दिली. त्यांनी हे जप्त केलेल्या सॅनिटायझरचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले. आरोपी कुणाल बैसवारे याच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाचे निनाद लांडे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, सॅनिटायझर निर्माण करणाºया वर्धमाननगरातील जयस्वाल यांच्या कारखान्यात रॉयल अल्कोहल नावाने सॅनिटायझर निर्माण करून ते चक्क दारूच्या बॉटल्समध्ये भरले आणि बाजारपेठेत विकायला पाठविले. त्यामुळे मद्यपींच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. ही माहिती कळल्यानंतर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून, कंपनीला हा माल विकण्यास प्रतिबंध केला आहे तसेच २५ लाखाचा मालही जप्त करण्यात आला आहे. मात्र ज्यांनी दारूच्या बॉटल्समधील सॅनिटायझर विकत घेतले त्यांनी त्याचा मोठा साठा करून तळीरामांना दारू म्हणून विकणे सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात चौथ्यानंदा असा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी शांतिनगर, नंदनवन तसेच वर्धमाननगरातही अशा घटना उघडकीस आल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक