शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध असतानाही चिनी फटाक्यांची विक्री; धोक्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 19:46 IST

Nagpur News चिनी फटाक्यांमध्ये पोट्याशिअम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणामधील काही ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर्रास विकत आहेत.

ठळक मुद्देलपून-छपून होत आहे विक्री

नागपूर : चिनी फटाक्यांमध्ये पोट्याशिअम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणामधील काही ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर्रास विकत आहेत. तर किरकोळ विक्रेत्यांकडून हे फटाके गल्लीबोळात व चौकाचौकांमध्ये विकले जात आहे.

गांधीबाग, जरीपटका, इतवारीतील लालईमली परिसर व आता सीए रोडवरील अनेक दुकानदार फटाक्यांच्या बंदुकी विकतात. परंतु यातील काही बंदुकीसोबतच चिनी फटाकेही विकतात. यात चिनी रॉकेटपासून, भूचक्र, पटक बॉम्ब (पॉपपॉप), पेन्सिल, पायली, विविध आकारातील ‘बॉम्ब’ फटाक्यासारखे अनेक फटाक्यांचा समावेश आहे. सूत्रानुसार, अनेक दुकानदारांनी चिनी फटाक्यांचा हा साठा दुकानात न ठेवता कोणी घरी, तर कोणी भाड्याच्या खोलीत केला आहे. येथून हा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत किंवा ग्राहकांच्या घरात पोहोचत आहे.

-‘हॅण्ड ग्रेनेड’ फटाका

यावर्षी चिनी फटाके आणखी धोकादायक प्रकारात आले आहे. ‘हॅण्ड ग्रेनेड’ फटाक्याचा वापर मूळ ‘ग्रेनेड’ सारखाच होतो. या फटाक्याला एक हूक दिला आहे. हा हूक एका दोरीला बांधला आहे. हूक खेचताच फटाक्यातून धूर निघतो आणि काही सेकंदातच तो फुटतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत पूर्वी ‘पॉपपॉप’ हा पावइंचात येत होता. यावर्षी तो एक आणि दोन इंचात आला आहे. कागदाच्या वेष्टनात असलेल्या या फटाक्याला खाली पटकताच फुटतो. दुसरा फटका म्हणजे, मिसाईल. एका चिनी बंदुकीत गोळीसारखा वापरला जाणारा हा फटका आहे. खऱ्याखुऱ्या बंदुकीसारखाच याचा वापर होतो.

- पोटॅशिअम परक्लोरेटवर बंदी

चिनी फटाक्यांमध्ये हलक्या प्रतीची पोटॅशिअम क्लोरेट पावडर वापरली जाते. त्यामुळे चिनी फटाके किती धोकादायक आहेत हे सहज लक्षात येते. भारतात फटाक्यांची निर्मिती करताना पोटॅशिअम परक्लोरेटचा वापर करण्यावर बंदी आहे.

-आरोग्यास हानिकारक

चिनी फटाके आरोग्यास हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. या फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरलेला कच्चा माल मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो. या फटाक्यांच्या धुराने केवळ प्रदूषणच नव्हे, तर अंधत्व येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022