शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध असतानाही नागपुरात चिनी फटाक्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 21:32 IST

चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणामधील काही ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर्रास विकत आहेत. तर किरकोळ विक्रेत्यांकडून हे फटाके गल्लीबोळात व चौकाचौकांमध्ये विकले जात आहे.

ठळक मुद्देधोक्याची शक्यता : लपून-छपून होत आहे विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणामधील काही ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर्रास विकत आहेत. तर किरकोळ विक्रेत्यांकडून हे फटाके गल्लीबोळात व चौकाचौकांमध्ये विकले जात आहे.गांधीबाग, जरीपटका, इतवारीतील लालईमली परिसर व आता सीए रोडवरील अनेक दुकानदार फटाक्यांच्या बंदुकी विकतात. परंतु यातील काही बंदुकीसोबतच चिनी फटाकेही विकतात. यात चिनी रॉकेटपासून, भूचक्र, पटक बॉम्ब (पॉपपॉप), पेन्सील, पायली, विविध आकारातील ‘बॉम्ब’ यासारख्या अनेक फटाक्यांचा समावेश आहे. सूत्रानुसार, अनेक दुकानदारांनी चिनी फटाक्यांचा हा साठा दुकानात न ठेवता कुणी आपल्या घरी तर कुणी भाड्याच्या खोलीत केला आहे. येथून हा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत किंवा ग्राहकांच्या घरात पोहचत आहे.मिसाईलचा वापर बंदुकीच्या गोळीसारखागेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चिनी फटाके आणखी धोकादायक प्रकारात आले आहे. पूवी ‘पॉपपॉप’ हा पावइंचात येत होता. यावर्षी तो एक आणि दोन इंचात आला आहे. कागदाच्या वेष्टनात असलेल्या या फटाक्याला खाली पटकताच फुटतो. दुसरा फटाका म्हणजे, मिसाईल. एका चिनी बंदुकीत गोळीसारखा वापरला जाणारा हा फटका आहे. खऱ्याखुऱ्या बंदुकीसारखाच याचा वापर होतो. सर्वात धोकादायक म्हणजे, ‘हॅण्ड ग्रेनेड’ फटाका. याचा वापर मूळ ‘ग्रेनेड’ सारखाच होतो. या फटाक्याला एक हुक दिला आहे. हा हुक एका दोरीला बांधला आहे. हुक खिचताच फटाक्यातून धूर निघतो आणि काही सेकंदातच तो फुटतो.चिनी फटाक्यांमध्ये हलक्या प्रतिची पोटॅशियम क्लोरेट पावडर वापरली जाते. या पावडरची किंमत सुमारे ५० रुपये किलो आहे. तर भारतीय फटाक्यांसाठी वापरली जाणारी पावडर ३०० रुपये किलो आहे. त्यामुळे चिनी फटाके किती धोकादायक आहेत हे सहज लक्षात येते. भारतात फटाक्यांची निर्मिती करताना पोटॅशियम परक्लोरेटचा वापर करण्यावर बंदी आहे.चिनी फटाक्यांमध्येही बनावटचिनी फटाक्यांवर निर्बंध आल्याने नागपुरात त्याच्यासारखे दिसणारे फटाके बाजारात आले आहेत. विशेषत: पटक बॉम्ब (पॉपपॉप) हा फटाका नागपुरात मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. ठोक विक्रेत्यांकडे तो आठ ते दहा रुपये किमतीला उपलब्ध आहे. परंतु तो फुटतच नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.आरोग्यास हानिकारकचिनी फटाके आरोग्यास हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. या फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरलेला कच्चा माल मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो. या फटाक्यांच्या धुराने केवळ प्रदूषणच नव्हे, तर अंधत्व येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :chinaचीनCrackers Banफटाके बंदी