शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

 विनापरवाना औषधांची विक्री : मेडिकलने दिली डीएमईआरला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:11 IST

विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकलच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत ही माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविली आहे. संबंधित डॉक्टरवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देएफडीएच्या कारवाईने खळबळ

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकलच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत ही माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविली आहे. संबंधित डॉक्टरवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.मेडिकलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख असलेले डॉ. प्रशांत टिपले हे सुटी व रविवार दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ‘इशा मार्इंड केअर’ नावाच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना सेवा द्यायचे. डॉ. टिपले विनापरवाना औषधांची विक्री करीत असल्याची तक्रार ‘एफडीए’ला मिळाली. त्या आधारे त्यांनी रविवार २५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या क्लिनिकवर धाड टाकून कारवाई केली. यावेळी १२ हजार रुपयांची औषधे व ११ बिलबुकही जप्त केले. पकडलेल्या सर्व औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ‘एफडीए’चे म्हणणे आहे. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त (औषधी) डॉ. राकेश तिरपुडे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरचे सहआयुक्त श्रीकांत फुले व नागपूरचे सहआयुक्त पी.एम.बल्लाळ यांनी केली. कारवाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच मेडिकल प्रशासनाने गंभीरतेने घेतले. मंगळवारी या प्रकरणाची माहिती ‘डीएमईआर’ला पाठविली आहे. याला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दुजोरा दिला आहे. पहिल्यांदाच मेडिकलच्या डॉक्टरच्या क्लिनिकवर ‘एफडीए’ची धाड पडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग