शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सूरजागड लोह खनिजाची विदर्भाबाहेर विक्री, राज्य व केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 9, 2024 18:05 IST

प्रकृती फाउंडेशन या सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सूरजागड येथील लोह खनिज विदर्भाबाहेरील उद्योगांना अवैधरित्या विकले जात असल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारसह इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली अन् या आरोपावर येत्या १४ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात प्रकृती फाउंडेशन या सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील प्रतिवादींमध्ये केंद्रीय पर्यावरण व वन विभाग, केंद्रीय कोळसा व खाण विभाग, भूगर्भशास्त्र व खणीकर्म संचालक, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्यातील महसूल व वन विभाग, उद्योग व खाण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनी यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका स्थित सूरजागड खाण लॉयड्स कंपनीला ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे. २००७ मध्ये लीज करार झाला आहे. त्यानुसार, लॉयड्स कंपनी या खाणीमधून स्वत:ला आवश्यक तेवढेच लोह खनिज काढू शकते. अतिरिक्त लोह खनिज काढल्यास ते विदर्भातील उद्योगांनाच वाजवी दरात विकणे बंधनकारक आहे. परंतु, कंपनी कराराचे उल्लंघन करून विदर्भाबाहेरच्या उद्योगांना लोह खनिज विकते, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे. फाउंडेशनतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.

प्रतिवादींना फटकारलेयापूर्वी फाउंडेशनने प्रतिवादींना निवेदन सादर न करताच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. त्यामुळे १८ जानेवारी २०२३ रोजी न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी आधी प्रतिवादींना निवेदन सादर करावे व प्रतिवादींनी त्या निवेदनावर कायद्यानुसार निर्णय घ्यावा, असे निर्देश देऊन ती याचिका निकाली काढली होती. तसेच, निवेदनाकडे दूर्लक्ष केले गेल्यास पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची याचिकाकर्त्यांना मुभा दिली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रतिवादींना निवेदन सादर केले. परंतु, त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. करिता, याचिकाकर्त्यांनी दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घेतली. या मुद्यावरून न्यायालयाने प्रतिवादींना फटकारले.

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय