शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

नीरवच्या जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री सुरू व्हायला लागणार पाच वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 11:20 IST

नीरव मोदी याच्या ११,४०० कोटीच्या पीएनबी घोटाळ्यात प्रवर्तन निदेशालयाने (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट-ईडी)ने आतापर्यंत ६३०० कोटीची मालमत्ता जप्त केली असली तरी तिची विक्री सुरू होण्यासाठी अजून किमान पाच वर्षे लागतील अशी माहिती आहे.

ठळक मुद्देसध्या एकूण ६३०० कोटीची मालमत्ता ईडीच्या ताब्यात आहे.

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीरव मोदी याच्या ११,४०० कोटीच्या पीएनबी घोटाळ्यात प्रवर्तन निदेशालयाने (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट-ईडी)ने आतापर्यंत ६३०० कोटीची मालमत्ता जप्त केली असली तरी तिची विक्री सुरू होण्यासाठी अजून किमान पाच वर्षे लागतील अशी माहिती आहे.मुंबईमधील ईडीच्या एका उच्चपदस्थ सूत्रानुसार ईडीने १५ फेब्रुवारीला ५१०० कोटीचे हिरेजडित दागिने व रत्ने, सोने, प्लॅटिनम इत्यादी जप्त केले होते. त्यानंतर १७ फेब्रुवारीला अजून ३५ ठिकाणांहून ५४९ कोटीचे दागिने जप्त केले व २२ फेब्रुवारीला २१ स्थावर मालमत्ता जप्त केल्या व सध्या एकूण ६३०० कोटीची मालमत्ता ईडीच्या ताब्यात आहे.या मालमत्तेपासून पीएनबीला रोख रक्कम मिळण्यासाठी किती कालावधी लागेल? या प्रश्नावर ईडीच्या या सूत्राने संपूर्ण प्रक्रियाच समजावून सांगितली.त्यानुसार सध्या जप्त झालेल्या मालमत्तेचे ६३०० कोटी हे पुस्तकी मूल्य (बुक व्हॅल्यू) आहे, ती कमी किंवा जास्त होऊ शकते. यासाठी जप्त झालेल्या प्रत्येक दागिन्याचे बहुमूल्य धातूचे व मालमत्तेचे बाजारमूल्य (मार्केट प्राईस) किती आहे ते तज्ज्ञांकडून ठरविले जाईल. याला किमान सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागेल.नंतरच्या टप्प्यात या सर्व मालमत्ता कुठे गहाण ठेवल्या आहेत का व त्यावर कोणाचा बोझा आहे का ते तपासले जाईल व नंतर या मालमत्ता कोर्टाच्या स्वाधीन करण्यात येतील़. या फेरतपासणीला दोन ते तीन वर्षे लागू शकतील. हे सर्व सुरू असतानाच ईडी तपासात आढळणाऱ्या पुराव्यांनुसार आरोपपत्र दोषी व्यक्तींविरुद्ध कोर्टात दाखल करेल व खटल्याची सुनावणी होऊन आरोपी दोषी ठरण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. त्यानंतर कोर्ट या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करून पंजाब नॅशनल बँकेला देईल. याला किमान एक वर्ष लागेल, अशी माहिती ईडीच्या सूत्राने दिली.दरम्यान भारतात आर्थिक गुन्हे करून विदेशात पळून जाणाऱ्या ललित मोदी, विजय मल्या, नीरव व निशाल मोदी, त्यांचा मामा मेहूल चोकसी अशा आरोपींकडून लवकर वसुली करण्यासाठी क्युजिटिव्ह इकॉनॉगिक आॅफेंडर्स बिल २०१७ आणण्याच्या तयारीत आहे. त्यात या आरोपींविरुद्ध शीघ्रगती (फास्ट ट्रॅक) कोर्टात दररोज खटला चालवण्याचे प्रावधान असेल, अशी माहितीही या सूत्राने दिली.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी