शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नागपुरात औषधी दुकानातून दारूची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:51 IST

काही औषधी विक्रेते दुकानातून दारूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर गणेशपेठ येथील एका मेडिकल स्टोअर्सवर धाड टाकून हा दारूविक्रीचा अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला.

ठळक मुद्देमेयो रुग्णालय चौकात धाड : संचालकाला रंगेहात अटक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जीवनावश्यक असल्याने नागरिकांना औषधांचा तुटवडा भासू नये म्हणून टाळेबंदीमधून औषधी दुकानांना वगळण्यात आले आहे. मात्र याचा फायदा घेत काही औषधी विक्रेते दुकानातून दारूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर गणेशपेठ येथील एका मेडिकल स्टोअर्सवर धाड टाकून हा दारूविक्रीचा अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी औषधी दुकानाचे संचालक दोसरभवन चौक निवासी निशांत ऊर्फ बंटी प्रमोद गुप्ता (३६) या आरोपीला अटक केली आहे. त्याचा सहकारी नरेश गुप्ता फरार झाला. बंटी गुप्ताचे मेयो रुग्णालय चौकात कंचन मेडिकल स्टोअर्स म्हणून औषधाचे दुकान आहे. फरार असलेला नरेश गुप्ता हा त्याचा नातेवाईक आहे. औषधी दुकानाच्या शेजारीच नरेश गुप्ताचे बीअरबार आणि हॉटेलही आहे. राज्यात १८ मार्चपासून टाळेबंदी लागल्यानंतर दारूची दुकानेही बंद करण्यात आली आहेत. यामुळे नरेशचे बीअरबारही बंद आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेशने शेजारीच असलेल्या बंटीच्या औषधी दुकानाचा फायदा घेत तिथून दारूविक्री सुरू केली. बंटीने दुकानासमोर बॉटलबंद पाण्याचे बॉक्स ठेवले होते. याच बॉक्समध्ये बीअर ठेवली होती. या दुकानातून ओळखीच्या ग्राहकांना दुप्पट किमतीने बीअरची विक्री करीत होता. बॉक्समध्ये पाण्याच्या बॉटल्सच्या मधे बीअर ठेवली असल्याने नरेश आणि बंटीच्या या युक्तीबाबत कुणाला कळत नव्हते. बंटी आपल्या विश्वासू ग्राहकांनाच बीअरची विक्री करीत होता. गणेशपेठ पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली. याच माहितीद्वारे पोलिसांनी बंटीच्या औषधी दुकानावर धाड टाकली व पाण्याच्या बॉक्समधून बीअरच्या ९० बॉटल जप्त केल्या. पोलिसांनी आरोपी बंटीलाही ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर नरेशबाबत माहिती मिळाली. कारवाईची माहिती मिळताच नरेश फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नरेशचा बार कायमच अवैध विक्रीसाठी चर्चेत असतो. त्याच्या विरोधात वेळोवेळी कारवाईसुद्धा झाली आहे. कारवाईनंतर पोलीस आणि प्रशासनावर दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो. या कारवाईच्या वेळीही असा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र गणेशपेठ पोलिसांनी यावेळी आरोपींची डाळ शिजू दिली नाही. या कारवाईबाबत महसूल विभाग व अन्न व औषधी विभागाला माहिती देण्यात आली. आरोपींचे औषधी दुकान आणि बीअरबारचा परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

थांबत नाही दारूची तस्करीमेयो रुग्णालयाजवळ अवैध दारूतस्करीचा मोठा अड्डा चालत असल्याची माहिती आहे. लोकमतने वेळोवेळी याबाबत माहितीही प्रकाशित केली आहे. येथून दररोज मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित जिल्हे आणि अवैध अड्ड्यावर दारूची तस्करी केली जाते. दोन महिन्यांपूर्वीच येथील एका दारूविक्रेत्याला तस्करीच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. तरीही अवैध विक्री थांबत नसल्याचे दिसून येते. पोलीस आणि महसूल विभागातर्फे कठोर कारवाई केली जात नसल्यानेच ही अवस्था असल्याचे बोलले जाते. महसूल विभाग आरोपींचा परवाना रद्द करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही केला जातो.

टॅग्स :liquor banदारूबंदीmedicinesऔषधं