शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

निराधार महिलेची मध्य प्रदेशात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

तक्रार मिळताच २४ तासांत छडा : खरेदीदारासह चौघांना अटक - आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश - १९ एप्रिलला झाले होते ...

तक्रार मिळताच २४ तासांत छडा : खरेदीदारासह चौघांना अटक

- आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश

- १९ एप्रिलला झाले होते अपहरण

- पोलिसांच्या तत्परतेमुळे महिला पोहोचली माहेरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पतीच्या मृत्युनंतर निराधार झालेल्या महिलेला दोन महिलांसह तिघांनी फूस लावून पळवून नेले. तिची मध्य प्रदेशात एका व्यक्तीला पावणे दोन लाखांत विक्री केली. या घटनेची तक्रार मिळताच, बेलतरोडी पोलिसांनी तत्परता दाखवून अवघ्या २४ तासांत आरोपींना पकडले आणि पीडित महिलेला तिच्या आईच्या हवाली केले.

पीडित महिला २४ वर्षांची आहे. तिला चार वर्षांचा मुलगा असून, ती अजनीत राहते. तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती निराधार झाली होती. स्वतः आणि मुलाचे भरण-पोषण करण्यासाठी ती मिळेल ते काम करत होती. कधी केटरर्सच्या कामालाही जायची. आरोपी कुणाल अरुण ढेपे (वय ३७, रा. गणेशनगर कोतवाली), विभा मनोज वर्धेकर (वय ४०, रा.महाकालीनगर) आणि मुस्कान मोहब्बुदिन शेख (वय ३१, न्यू फुटाळा वस्ती) यांच्याशी तिची ओळख होती. त्यांच्यासोबत एक-दोनदा ती बाहेरही गेली होती. ती अधूनमधून आईकडेही यायची. १९ एप्रिलला ती तिच्या बेलतरोडीतील आईच्या घरी आली होती. रात्री परत जाताना आरोपी कुणाल ढेपे, विभा वर्धेकर आणि मुस्कान शेख या तिघांनी तिला फूस लावून मध्य प्रदेशातील उज्जैन जवळच्या खाबतखेडा येथे नेले. तेथील भरत रघुनाथ सोलंकी (वय २४) त्याच्याकडून एक लाख ७० हजार रुपये घेऊन आरोपींनी पीडित महिलेला त्याच्या हवाली केले.

आरोपी सोलंकीने तिला विकत घेतल्यानंतर, तो तिचा पत्नीसारखा उपभोग घेऊ लागला. त्याने तिचा मोबाइलही हिसकावून घेतला होता. तिच्यावर तो सतत पाळत ठेवायचा. गुरुवारी सकाळी संधी मिळताच पीडित महिलेने तिच्या आईच्या मोबाइलवर फोन करून, तिला आपबिती सांगितली. आपले अपहरण करून अनोळखी इसमाला विकल्याचीही माहिती दिली. विशेष म्हणजे, १९ एप्रिलला रात्री ती घरून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत घरी पोहोचली नाही. त्यामुळे तिच्या आईने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविली होती. त्यामुळे मुलीचा फोन येताच, आई बेलतरोडी ठाण्यात पोहोचली. तेथे तिने मुलीने अपहरण झाले असून, तिला विकण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. ठाणेदार विजय आकोत यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.दिलीप झळके, पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. अपहृत महिलेचा फोन ज्या नंबरवरून आला होता, त्याचे लोकेशन काढण्यात आले. त्यानंतर, बेलतरोडी पोलिसांचे एक पथक गुरुवारी उज्जैनकडे पाठविण्यात आले. पोलीस पथकाने नमूद मोबाइल नंबरच्या आधारे पीडित महिला, तसेच भरत सोलंकी या दोघांचा छडा लावला. त्यांना शुक्रवारी ताब्यात घेतले आणि शनिवारी हे पथक नागपूरला पोहोचले. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महिलेची विक्री करणाऱ्या आरोपी कुणाल ढेपे, विभा वर्धेकर आणि मुस्कान शेख या तिघांना शनिवारी सायंकाळी पकडण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू होती.

----

आरोपी ढेपे सराईत गुन्हेगार

या प्रकरणातील आरोपी कुणाल ढेपे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध चोरी, घरफोडीचेही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. विकण्यात आलेल्या महिलेची माहिती मिळताच, तिचा आणि आरोपींचा छडा लावण्याची प्रशंसनीय कामगिरी ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वात

उपनिरीक्षक विकास अजय मनपिया, हवालदार शैलेश बडोदेकर, नायक बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख यांनी बजावली.

---