शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सख्या रे घायाळ मी हरिणी : लागू-फुले 'अ‍ॅक्टिंग स्कूल'ने भारावले रसिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:41 IST

‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ हे मोहन आगाशे व निळू फुले आणि बॅकड्रापला डॉ. लागू यांची पार्श्वभूमी असलेले गाणे वाजते, तेव्हा रसिकांच्या तोंडून ‘व्वा क्या बात है’ असे शब्द ऐकू येतात, तेव्हा अभिनय हृदयाचा ठोका कसा चुकवतो, याची जाणीव झाली.

ठळक मुद्देचौथा ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे या रंगमंचावर वावरणाऱ्या मातब्बर नटांनी स्वत:चे वेगळे असे ‘अ‍ॅक्टिंग स्कूल’ निर्माण केले आहे. फुले, लागू आता हयात नाहीत. मात्र, त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आजही रसिक उत्सुक आहेत, याची अनुभूती चौथ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिसून आली. १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांचा गाजलेला ‘सामना’ हा चित्रपट बघण्यासाठी रसिक सज्ज होते आणि चित्रपटातील एका रंजक घटनेवर जेव्हा अतिशय प्रासंगिक असे ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ हे मोहन आगाशे व निळू फुले आणि बॅकड्रापला डॉ. लागू यांची पार्श्वभूमी असलेले गाणे वाजते, तेव्हा रसिकांच्या तोंडून ‘व्वा क्या बात है’ असे शब्द ऐकू येतात, तेव्हा अभिनय हृदयाचा ठोका कसा चुकवतो, याची जाणीव झाली.आयनॉक्स तुली मॉल येथे सुरू असलेल्या या चित्रपट महोत्सवात शुक्रवारी विविध भाषांतील देश-परदेशातील चित्रपटांचे सादरीकरण झाले. मात्र, उत्सुकता होती ती ‘सामना’चीच. रसिकांच्या संगतीला खुद्द डॉ. जब्बार पटेलही होते. त्यामुळे, अशा आशघन चित्रपटाचा रसास्वाद घेण्याची बातच निराळी होती. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे संपूर्ण चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर असलेले गाणे, जणू डोळ्यातून चटक अश्रूची धार मोकळी करणारे होते.कथानक तेच, बोलीभाषा वेगळेपण देते - जब्बार पटेलहॉलिवूड आणि मराठी चित्रपटांतील फरक हाच आहे की हॉलिवूडपटात प्रत्येक पात्राची स्वतंत्र बोलीभाषा असते. मराठीमध्ये मात्र प्रमाण भाषेचाच आग्रह दिसून येतो. कथानकांमध्ये आता वेगळेपणा कुठून आणणार. बोलीभाषा आणि त्या भागातील संवेदनेमुळे चित्रपटांच्या कथेला वेगळा आयाम मिळतो ही बाब आता मराठी दिग्दर्शकांनी हेरायला हवी. विदर्भात वेगवेगळ्या बोली आहेत. त्या बोली सहज उतरतील तर मजा येईल, अशी भावना डॉ. जब्बार पटेल यांनी बोलून दाखवली.ऑक्टोबरमध्ये घेऊ चित्रपट समीक्षा कार्यशाळाहल्ली चित्रपटांचे रिव्ह्यूच येतात. त्यालाच समीक्षण म्हणण्याचा चुकीचा पायंडा पडला आहे. समीक्षणाची समज निर्माण होण्यासाठी ऑक्टोबरमध्ये चित्रपट समीक्षा कार्यशाळा घेण्याचा विचार सुरू असल्याचे जब्बार पटेल म्हणाले.

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूNilu Phuleनिळू फुले