शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सज्जन जिंदल रिफायनरी उभारण्यास उत्सुक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 10:26 IST

पोलाद आणि समुद्री बंदरे यात यशस्वी झाल्यानंतर आता जेएसडब्ल्यू स्टील्स समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल कच्च्या तेलाची रिफायनरी उभारण्यासाठी उत्सुक आहेत, अशी माहिती जिंदल समूहाच्या निकटवर्ती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देजिंदल समूहाला विदर्भ अनोळखी नाही

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलाद आणि समुद्री बंदरे यात यशस्वी झाल्यानंतर आता जेएसडब्ल्यू स्टील्स समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल कच्च्या तेलाची रिफायनरी उभारण्यासाठी उत्सुक आहेत, अशी माहिती जिंदल समूहाच्या निकटवर्ती सूत्रांनी दिली आहे.गेल्या वर्षी जेएसडब्ल्यू समूहाने कर्ज सापळ्यात अडकलेल्या भूषण स्टील्स या कंपनीचे अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाल्यानंतर आता सज्जन जिंदल यांनी रिफायनरी उद्योगाकडे मोर्चा वळवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.सध्या नाणार येथील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांकडून विरोध होतो आहे, त्यामुळे ही रिफायनरी विदर्भात हलवा अशी मागणी लोकमतचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे. दुसरी बाब म्हणजे राज्य सरकारने एक नवीन रिफायनरी उभारण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर सज्जन जिंदल रिफायनरी क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक आहेत ही बातमी उत्साहवर्धक आहे.दरम्यान या बाबतीत सज्जन जिंदल यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता जिंदल विदेशात असल्याचे कळले.मूळच्या हरियाणाच्या असलेल्या जिंदल समूहाने २०११ मध्ये कळमेश्वरच्या इस्पात इंडस्ट्रीजचे (पूर्वीची निप्पॉन डेन्रो इस्पात) अधिग्रहण केले, त्यामुळे कळमेश्वरचा कलर्ड शीटस् बनवण्याचा कारखाना व प. महाराष्टÑातील खोपोलीचा पोलाद कारखाना व गडचिरोलीतील भामरागड येथील आयर्न ओअरची खाण ही सध्या जेएसडब्ल्यू समूहाकडे आली. त्यानंतर जेएसडब्ल्यू समूहाने रत्नागिरीला बंदर उभारले आहे. समूहाची उलाढाल सध्या ८४,००० कोटी आहे. त्यामुळे जिंदल समूहाला विदर्भ नवा नाही.

टॅग्स :Jindal Companyजिंदाल कंपनी