शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘सजना है मुझे सजना के लिए..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:11 IST

सजणे हा युवती, महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बाहेर पडायचे म्हटलं की तासभरापासून महिलांचे सजणे सुरू होते. आपल्याला चांगला दिसेल असा साजशृंगार करून मगच त्या बाहेर पडतात. स्वरशिल्पने शृंगार हा विषय घेऊन गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली. कार्यक्रमात गायिकांनी शृंगारावरील अप्रतिम गीते सादर करून रसिकांना चिंब केले.

ठळक मुद्देशृंगार गीतांनी रसिक चिंब : ‘नगमे साज शिंगार के’ला प्रतिसाद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सजणे हा युवती, महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बाहेर पडायचे म्हटलं की तासभरापासून महिलांचे सजणे सुरू होते. आपल्याला चांगला दिसेल असा साजशृंगार करून मगच त्या बाहेर पडतात. स्वरशिल्पने शृंगार हा विषय घेऊन गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली. कार्यक्रमात गायिकांनी शृंगारावरील अप्रतिम गीते सादर करून रसिकांना चिंब केले.स्वरशिल्पच्या वतीने लक्ष्मीनगरच्या सायंटिफिक सभागृहात ‘नगमे साज शिंगार के’ हा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भाग्यश्री बारस्कर यांच्या ‘ओ घटा सावरी’ या गीताने झाली. त्यानंतर अरुणा मार्कडे यांनी ‘रात का समा’, मृणालिनी भगत यांनी ‘कांटो से खींच के’, विद्या काणे, केतकी दामले यांनी ‘गरजत बरसत’ हे गीत सादर केले. तर ‘सजना है मुझे’ या सुप्रिया फडके यांच्या गीताला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. निहारिका छाजेड यांनी ‘आजा पिया तोहे’, डॉ. संध्या मांजरेकर, भाग्यश्री बारस्कर यांनी ‘जानू जानू रे’, श्वेता देशपांडे यांनी ‘बैया ना धरो’, संध्या पाठक यांनी ‘घडी घडी मोरा’ हे गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात त्यानंतर डॉ. सुनिता मोहरीर, पल्लवी उपदेव यांनी ‘कोई आयेगा आयेगा’, रेणुका वेलणकर यांनी ‘मेरी बिंदीया तेरी निंदीया’, मनीषा सावरकर यांनी ‘मेरे हाथो मे नौ नौ’ हे गीत सादर करून रसिकांसमोर अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृती ताज्या केल्या. कार्यक्रमात अरुणा मार्कंडे, ज्योत्स्ना नगरारे, पौर्णिमा गोखले, विद्या काणे, निहारिका छाजेड, भाग्यश्री बारस्कर, केतकी दामले, डॉ. संध्या मांजरेकर, श्वेता देशपांडे, सुप्रिया फडके, डॉ. सुनिता मोहरीर, संध्या पाठक, ज्योत्स्ना नगरारे, मृणालिनी भगत, मनीषा सावरकर, पल्लवी उपदेव, रेणुका वेलणकर यांंनी अप्रतिम गीते सादर केली. कार्यक्रमाची सांगता भाग्यश्री बारस्कर यांच्या ‘मेरा बाबु छैल छबिला’ या गीताने झाली. संकल्पना भाग्यश्री बारस्कर, संगीत नंदु गोहाणे यांचे होते. कार्यक्रमाचे सुरेख निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले. गायक कलावंतांना की बोर्डवर राजा राठोड, तबल्यावर प्रशांत नागमोते, ढोलकीवर अनिकेत दहेकर, ऑक्टोपॅडवर नंदू गोहाणे, गिटारवर रितेश त्रिवेदी यांनी साथसंगत केली.

टॅग्स :musicसंगीतScientific Hall, Nagpurसायंटिफिक सभागृह