नागपूर : हनुमान देवस्थान पंचकमिटी, ओमनगर सक्करदराच्या वतीने संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव २ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता उत्सावाचे स्वरूप आटोपशीर राहील. दररोज सकाळी ५.३० वा काकडा, दुपारी १ ते ३ महिलांचे भजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री ८ ते १०.३० महिलांचे हरिकीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ९ फेब्रुवारीला रोजी रात्री ८.३० ला अनुक्रमे हभप विलास महाराज जिल्हारे, हभप उमेश महाराज बारापात्रे आणि हभप भीमराव कोठे महाराज यांचे कीर्तन होईल. एकादशीनिमित्त ९ फेब्रुवारीला दु. १२ ते ते २ वाजेपर्यंत हभप महेश नंदरधने महाराज यांचे हरिकीर्तन होईल, अशी माहिती हनुमान देवस्थान पंचकमिटी, श्री निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव समिती आणि माँ वैष्णोदेवी नवरात्र उत्सव समिती, ओमनगर यांनी दिली आहे.
संत निवृत्तिनाथ महाराज स्मरणोत्सव आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST