शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

यालाच म्हणतात 'गेले कि हड्डी '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 01:25 IST

मांसाहार करीत असताना मांसाचे हाड अन्न नलिकेत जाऊन फसले.६० वर्षीय त्या इसमाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. खाणेपिणेही बंद झाले.

ठळक मुद्देखासगी इस्पितळांना अपयश : सुपरच्या गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजी विभागाला आले यश : ६० वर्षीय इसमाला मिळाले जीवनदान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मांसाहार करीत असताना मांसाचे हाड अन्न नलिकेत जाऊन फसले. ६० वर्षीय त्या इसमाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. खाणेपिणेही बंद झाले. काही खासगी इस्पितळात उपचार घेतले. एण्डोस्कोपीतून हाड बाहेर काढण्याचा प्रयत्नही झाला. परंतु यश आले नाही. दुसऱ्या एका खासगी इस्पितळाने यावरील उपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च सांगितला. परंतु एवढे पैसे नसल्याने अखेर मंगळवारी दुपारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठले. गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी त्यांना तपासले. तातडीने एण्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. अनुभव व कौशल्याच्या बळावर पुढील तासभरात त्यांना अन्न नलिकेत फसलेले हाड बाहेर काढण्यात यश आले. रुग्णाला जीवनदान मिळाले.एकनाथ पांडुरंग सहारे (६०) रा. रामनगर असे त्या रुग्णाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ते ३ जानेवारी रोजी मांसाहार करीत होते. नकळत मांसासोबत त्यांनी हाडही गिळले. हे हाड अन्न नलिकेत जाऊन फसले. पाणी, केळी खाऊनही त्याचा फायदा होत नसल्याचे पाहत नातेवाईकांनी एका खासगी इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. त्याच डॉक्टरांनी एका गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजी इस्पितळात पाठविले. येथील डॉक्टरांनी एण्डोस्कोपीद्वारे हाड काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. त्यांनीही दुसºया एका इस्पितळात पाठविले. त्या इस्पितळाने ७५ हजार ते १ लाखांचा खर्च सांगितला. सहारे हे व्यवसायाने स्कूलबस चालक आहेत. एवढा खर्च करणे त्यांना शक्य नव्हता. यामुळे २८ जानेवारी रोजी त्यांच्या नातेवाईकांनी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात दाखल केले. विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी तपासून त्यांचा एक्स-रे काढला. एण्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांना याची माहिती दिली.डॉ. गुुप्ता यांनी लोकमतला सांगितले, हाड बाहेर काढण्यासाठी पोट फाडून शस्त्रक्रिया करणे किंवा विना शस्त्रक्रिया एण्डोस्कोपीद्वारे हाड बाहेर काढणे हा पर्याय होता. पहिला प्रयत्न म्हणून एण्डोस्कोपीद्वारे हाड बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. परंतु आहारनलिकेत फसलेले हाड दोन्ही बाजूने टोकदार होते. यामुळे एण्डोस्कोपीद्वारे बाहेर काढताना अन्न नलिकेच्या इतर भागात व श्वास नलिकेत छिद्र होण्याची भीती होती. परंतु अनुभवाच्या बळावर व कौशल्याने पुढील तासभरात हाड बाहेर काढले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. श्वास नलिकेत कुठे छिद्र झाल्याचे दिसून येत नाही आहे. पुढील ४८ तास त्यांना रुग्णालयात ठेवले जाईल, असेही ते म्हणाले.डॉ. गुप्ता यांना या प्रक्रियेत डॉ. हरीत कोठारी, डॉ. विनीत गुप्ता, बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. रामटेके, तंत्रज्ञ सोनल गठ्ठेवार यांचे सहकार्य मिळाले. डॉ. गुप्ता यांनी आतापर्यंत एण्डोस्कोपीद्वारे पोटातून पेन्सील सेल, नाणे, खिळा बाहेर काढून रुग्णांना जीवनदान दिले आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयnagpurनागपूर