शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अंबाझरी तलावाचा सुरक्षा बांध जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 21:39 IST

Ambazari lake Nagpur News गेली दीडशे वर्षे सतत नागपूरकरांची तहान भागविणारा, आकर्षण व अभिमानाचा विषय असलेला अंबाझरी तलाव आज मात्र संकटावस्थेतून जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेली दीडशे वर्षे सतत नागपूरकरांची तहान भागविणारा, आकर्षण व अभिमानाचा विषय असलेला अंबाझरी तलाव आज मात्र संकटावस्थेतून जात आहे. तलावाचा सुरक्षा बांध जीर्णावस्थेत गेला असून अनेक भागात खंडीत झाला आहे. अतिवृष्टीमुळे जर पाण्याची पातळी वाढली आणि सुरक्षा बांध फुटला तर पश्चिम नागपूरच्या अनेक वस्त्या जलमय होण्याची, जीवित व वित्त हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अंबाझरी तलाव नागपूरच्या ११ मोठा तलावांपैकी एक असून शहराचे वैभव आहे. शहरातून वाहणारी नागनदी या तलावातूनच उगम पावते. यावर्षी सर्वच ठिकाणी चांगला पाउस झाला आणि अशा परिस्थितीत नाग नदीच्या पानलोट क्षेत्रातून पावसाळ््यात पाण्याची आवक झाली तर तलावाला धोका होण्याची शक्यता आहे. अशात तलावाचा सुरक्षा बांध अनेक भागातून खंडीत झाला असून आधीच आयुष्य संपलेल्या तलावाच्या अस्तित्वाचे संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ असलेल्या सांडव्यापासून ते अंबाझरी उद्यानापर्यंत सुरक्षा भिंतीचा अनेक भाग जीर्ण झाला आहे. अनेक वर्षाचे बांधकाम असलेल्या सुरक्षा बांधाची जीर्णावस्था लक्षात घेत चार वर्षापासून तलाव बळकटीकरणाबाबत महापालिक ा व मेट्रोचा प्रस्ताव धुळखात पडला आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.मेट्रोचे बांधकाम हेही धोक्याचे कारणतलावावर आलेल्या संकटाचे मेट्रो हेही एक कारण आहे. जल अभ्यासक प्रवीण महाजन यांनी, मेट्रो रेल्वेचे १४ पिलर्स अंबाझरी तलावासाठी डोकेदुखी ठरणार तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली आहे. या पीलर्सवर धावणाऱ्या मेट्रोच्या कंपनामुळे अंबाझरी तलावाच्या सुरक्षा भिंतीला तडे जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. याबाबत अभ्यास झालेत. काही उपाय योजना सूचविण्यात आल्यात. तलावावर मालकी महापालिकेची असली तरी बळकटीकरण व सुशोभिकरणाची जबाबदारी मेट्रो व जलसंपदा विभागाकडे आहे. मात्र चार वर्षात कागदांपलीकडे काहीच पुढे सरकले नाही. मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनने जवळपास पाच ते सहा हजार कोटींची बांधकामे चार वर्षात पूर्ण केली पण १०-२० कोटीचा अंबाझरी तलाव बळकटीकरण व सुशोभिकरण कोणालाही पूर्ण करता आले नाही, हे दुर्दैव असल्याची खंत महाजन यांनी व्यक्त केली.न्यायालयाच्या निर्देशालाही हरताळखासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून तलावांच्या सुरक्षिते विषयी मार्गदर्शन केले. दगडाचे पीचींग, सौंदर्यीकरण, सुशोभीकरण सोबतच बळकटीकरण करून नागपूरकरांना या संकटातून वाचवण्याचे सूचना केल्यात. उल्लेखनीय म्हणजे उच्च न्यायालयाने सुध्दा मार्च २०१८ मध्ये उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र त्या निर्देशांनाही जबाबदार यंत्रणेकडून हरताळ फासण्यात आला.

 

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलाव