शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पहिल्या पॉझिटिव्ह महिलेची सुरक्षित प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 20:27 IST

मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये नागपुरातील पहिल्या पॉझिटिव्ह महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत ‘नॉर्मल’ प्रसूती केली.

ठळक मुद्देकोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये नागपुरातील पहिल्या पॉझिटिव्ह महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत ‘नॉर्मल’ प्रसूती केली. या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. कोविड हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. सतरंजीपुºयातील कोरोनाबाधित मृताच्या शेजारी राहणाºया २९ वर्षीय गर्भवतीसह तिच्या कुटुंबातील सात जणांना १६ एप्रिल रोजी आमदार निवासातील अलगीकरण कक्षात दाखल केले होते. याच दिवशी या सर्वांचे नमुने घेण्यात आले. १९ एप्रिल रोजी गर्भवतीसह तिच्या पतीचा नमुना पॉझिटिव्ह आला. या दोघांना मेडिकलमध्ये दाखल केले. गर्भवती महिलेची विशेष काळजी घेतली जात होती. विशेष म्हणजे, सात दिवसानंतर तिच्या घशातील द्रव्याचा नमुना घेऊन तपासले असता तो निगेटिव्ह आला. दहा दिवसानंतर पुन्हा नमुने तपासण्यात आले असता तोसुद्धा निगेटिव्ह आला. तरीही प्रतिबंधात्मक उपाय करून आज रविवारी तिची प्रसूती करण्यात आली. नॉर्मल प्रसूती होऊन तिने मुलाला जन्म दिला. मुलाची आणि त्याच्या आईची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ४८ तासानंतर जन्मलेल्या बाळाचे नमुने तपासले जाणार असल्याचे डॉ. राजुता फुके यांनी सांगितले. ही प्रसूती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. मंजुश्री वाईकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. राजुता फुके, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. भारत भूषण, कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. शुभांगी फुटाणे यांनी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.त्या तान्हुलीचा नमुना निगेटिव्ह२९ एप्रिल रोजी मेयोमध्ये प्रसूती झाल्यानंतर त्या मातेचा नमुना पॉझिटिव्ह आला. या घटनेने खळबळ उडाली होती. सुरक्षा साधने घालूनच डॉक्टरांनी ही प्रसूती केली होती. प्रसूतीनंतर मातेपासून काही अंतरावर नवजात तान्हुलीला ठेवण्यात आले. बाळाला वेळोवेळी मातेचे दूध दिले जात होते. दरम्यान तान्हुलीला आईपासून दूर ठेवण्यात आले. मातेचे दूध एका वाटीत काढून चमच्याने तिला पाजले जात आहे. चार दिवसानंतर म्हणजे शनिवारी त्या तान्हुलीचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. आज अहवाल निगेटिव्ह आल्याने तिच्या आईसह डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस