शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

साेयाबीन : काेणतेही वाण पेरा, नुकसान अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

सुनील चरपे लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नगदी पिकांमध्ये कपाशीला पर्याय म्हणून साेयाबीनला प्रथम पसंती दर्शविली हाेती. ...

सुनील चरपे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नगदी पिकांमध्ये कपाशीला पर्याय म्हणून साेयाबीनला प्रथम पसंती दर्शविली हाेती. सुरुवातीला उत्पादनाचा कमी काळ व उत्पादनखर्चात अधिक उत्पादन हाेत असल्याने तसेच चांगला बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यात साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र, सन २०१४-१५ पासून राेग व किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या उत्पादनात घट व्हायला सुरुवात झाली. वाढता उत्पादनखर्च व मिळणारा कमी बाजारभाव यामुळे दरवर्षी पदरात ताेटाच पडताे. हल्ली काेणतेही वाण पेरा, नुकसान अटळ आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील साेयाबीन उत्पादकांनी व्यक्त केली आहे. परिणामी, जिल्ह्यातील साेयाबीन पेरणीक्षेत्र कमी हाेत आहे.

साेयाबीन हे सरळ वाण असल्याने यात हायब्रीड वाण उपलब्ध नाही. अलीकडे शेतकरी साेयाबीनचे कमी काळात येणारे (अर्ली व्हेरायटी-८५ ते ९० दिवस), मध्यम काळात येणारे (मीडियम व्हेरायटी-९० ते १०० दिवस) व उशिरा येणारे (लेट व्हेरायटी-१०५ ते १२० दिवस) वाण पेरणीसाठी वापरतात. यात अर्ली व मीडियम व्हेरायटीला अधिक प्राधान्य दिले जात असले तरी या दाेन्ही व्हेरायटी राेग व किडींना माेठ्या प्रमाणात बळी पडतात. लेट व्हेरायटीचे साेयाबीन तुलनेत राेग व किडींना कमी बळी पडत असले तरी कापणीच्या काळात परतीचा पाऊस येत असल्याने नुकसान हाेते.

जेएस-७१०५ (लेट व्हेरायटी) याच वाणापासून साेयाबीनच्या तिन्ही व्हेरायटींमधील विविध वाण विकसित करण्यात आले आहे. हे सर्व वाण संशाेधित म्हणून ओळखले जातात. यात जेएस-३३५, जेएस-९३०५, जेएस-९७५२, जेएस-९५६०, एमएयूएस-७१, एमएयूएस-८१, एमएयूएस-७०, एमएयूएस-८१, एमएयूएस-१५८, एमएयूएस-४७, एमएयूएस-४७, एमएयूएस-६१, एमएयूएस-६१२, डीएस-२२८ (फुले कल्याणी), केडीएस-३४४ (फुले अग्रणी), एमएसीएस-५, एमएसीएस-४५०, एमएसीएस-१३, एमएसीएस-१२४, एमएसीएस-११८८, एनसीआर-३७, टीएएमएस-९८२१ या वाणांचा समावेश आहे.

...

कमी काळात येणारे सोयाबीन

कमी काळात (८५ ते ९० दिवस) येणाऱ्या साेयाबीनच्या वाणाला शेतकरी प्रथम पसंती दर्शवितात. या वाणाच्या साेयाबीन पिकावर माेठ्या प्रमाणात खाेडमाशी, चक्रीभुंगा यासह इतर किडींचा तसेच येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेत असल्याने या वाणाचा उत्पादनखर्च वाढत आहे. राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

....

मध्यम काळात येणारे सोयाबीन

मध्यम काळात (९० ते १०० दिवस) येणारे वाण कमी काळात येणाऱ्या वाणाच्या तुलनेत थाेडे चांगले आहे. या वाणाला किडी व राेगाचा प्रादुर्भाव कमी हाेताे. मात्र, या वाणाच्या साेयाबीनला पीक कापणीच्या काळात परतीच्या पावसाचा धाेका उद्भवण्याची शक्यता असते. रबी पिकासाठी शेत तयार करण्याच्या दृष्टीने हे दाेन्ही चांगले असल्याची माहिती साेयाबीन उत्पादकांनी दिली.

...

अधिक काळात येणारे सोयाबीन

अधिक काळात (१०५ ते १२०) येणाऱ्या वाणाच्या साेयाबीनवर किडी व राेगाचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव हाेत असला तरी पीक कापणीच्या काळात या वाणाला परतीच्या पावसाचा सर्वाधिक धाेका असताे. शिवाय, या वाणामुळे रबीच्या पिकांसाठी शेत तयार करायला कमी काळ मिळत असल्याने रबी पिकांची पेरणी लांबते. त्यामुळे या वाणाचा वापर बराच कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...