शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
5
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
6
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
7
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
8
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
9
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
11
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
12
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
13
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
14
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
15
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
16
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
17
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
18
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
19
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
20
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार

विषण्णता हेच कुरूप चित्रांचे सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 10:27 IST

चित्र पाहताना कुरुप वाटत असले तर त्या प्रसंगातील मर्म अस्वस्थ आणि विषण्ण करणारे असते. खरतर मनात विषण्णतेची भावना निर्माण होणे, हेच त्या चित्रातील सौंदर्य होय, असे मनोगत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्जना निर्माणमध्ये ‘विरुपतेच्या तळातील सौंदर्य’वर व्याख्यान

ऑनलाईन लोकमतनागपूर : काही चित्र बघायला कुरुप असली तर त्यातील आशय हा मनाला चटका लावणारा असतो. कारागृहात मरणावस्थेत पडलेल्या पित्याला दूध पाजणारी मुलगी असो की बुडत्या जहाजात जगण्याचा आकांत करणाऱ्या प्रवाशांचे चित्र असो, हे चित्र पाहताना कुरुप वाटत असले तर त्या प्रसंगातील मर्म अस्वस्थ आणि विषण्ण करणारे असते. खरतर मनात विषण्णतेची भावना निर्माण होणे, हेच त्या चित्रातील सौंदर्य होय, असे मनोगत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.विदर्भ साहित्य संघातर्फे ‘सर्जना निर्माण’ या उपक्रमांतर्गत शनिवारी ‘विरुपतेच्या तळातील सौंदर्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी नाट्यकर्मी डॉ. पराग घोंगे यांनी चित्रकार मेरीला यांचे पित्याला स्तनपान करविणाऱ्या मुलीचे ‘रोमन चॅरिटी’ व सॅल्वाडोर डाली यांचे ‘येलो क्राईस्ट’ या चित्रांवर भाष्य केले तर चंद्रकांत चन्ने यांनी अबनिंद्रनाथ टागोर यांचे ‘एन्ड ऑफ जर्नी’ व जेरीकॉल्टचे ‘रॉफ्ट ऑफ मेडूसा’ या चित्रांवर भाष्य केले. डॉ. पराग घोंगे यांनी रोमन चॅरिटी व येलो क्राईस्ट या चित्रातील सौंदर्याचे भावस्पर्शी वर्णन केले. सिमोन या व्यक्तीला रोमन राजा कारागृहात बंदिस्त करतो व मृत्यूची शिक्षा सुनावून अन्नपाणी बंद करतो. अशावेळी त्यांची मुलगी पेरो पित्याला दररोज भेटण्याची परवानगी मागते व कारागृहात त्याचे स्तनपान करून त्यास जगविण्याचा अगतिक प्रयत्न करते. या चित्रात अश्लीलता जाणवत नाही तर त्यातील क्रूरता, पिता-पुत्रीची अगतिकता मनाला चटका लावते. प्रभू येशूला अवकाशात क्रू सावर चढविण्याचे चित्रही असेच मनाला चटका लावणारे असल्याचे डॉ. घोंगे यांनी सांगितले.चंद्रकांत चन्ने यांनी रॉफ्ट ऑफ मेडूसा या चित्राचे वर्णन केले. फ्रेन्च चित्रकार जेरीकॉल्ट याने १८८६ साली हे चित्र रेखाटले होते. पाहणाऱ्यांना हादरविणाऱ्या या चित्राद्वारे त्यावेळी राज्यकारभारातील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारावरही कठोर प्रहार केला होता. त्यामुळे त्यावर बंदीही घालण्यात आली होती. जहाज बुडत असताना प्रयत्न करून स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची अगतिकता व आक्रोश या २४ फुटाच्या चित्रामधून अगदी मार्मिकपणे दर्शविला होता. यानंतर १०० वर्षानी अबनिंद्रनाथ टागोर यांनी ‘एन्ड ऑफ जर्नी’ रेखाटले.युरोपियन शिक्षण व्यवस्थेचा विरोध हा या चित्राचा आशय होता. आपल्या मृत मालकाची जमापुंजी त्याच्या मुलांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उंटाची अगतिकता या चित्रात दर्शविली होती. कवी किंवा लेखक विषयाचे विवेचन करू शकतो. चित्रकाराला ती सोय नसते. पण ही विषण्णता समजली की त्यातील सौंदर्य आनंद देते, अशी भावना चन्ने यांनी व्यक्त केली.

टॅग्स :paintingचित्रकला